पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या उपस्थितीत महा-दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ

Posted On: 23 OCT 2022 8:00PM by PIB Mumbai

 

  • आज अयोध्या भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या सुवर्ण अध्यायाचे प्रतिबिंब आहे.
  • या दिव्यांचा प्रकाश आणि त्यांचा प्रभाव, भारताच्या सत्यमेव जयतेया मूलमंत्राचा उद्घोष करत आहे.
  • दिवाळीचे दिवे भारताचे आदर्श, मूल्य आणि तत्वाच्या जिवंत ऊर्जेचे प्रतीक आहे.
  • दिवा तिमिराचा नाश करतो आणि समर्पणाची भावना निर्माण करतो

 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत  महादीपोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी, शरयू तीरावर राम की पैदीइथे त्रिमीती होलोग्राफीक प्रोजेक्शन मॅपिंग शोचे आणि संगीतमय, लेजर शोचे अवलोकनही केले.

यावेळी, उपस्थितांशी बोलतांना पंतप्रधानांनी प्रभू श्रीरामांची स्तुती केली. आज अयोध्यानगरी दिव्यांच्या प्रकाशामुळे पावन झाली आहे, या पवित्र भावनेने पुलकित झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनात आज अयोध्या एक सुवर्णपान ठरली आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

याआधी राज्याभिषेकासाठी इथे आले होते तेव्हा त्यांच्या मनात भावनांचा काय कल्लोळ होता, ते पंतप्रधानांनी सांगितले. प्रभू श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासानंतर परतले तेव्हा अयोध्या कशी सजली असेल याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक आणि आश्चर्य व्यक्त केले. आज या अमृत काळामध्ये, प्रभू रामाच्या आशीर्वादाने, आम्ही अयोध्येचे दिव्यत्व आणि अमरत्व पाहत आहोत, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

आपण त्या परंपरा आणि संस्कृतीचे वाहक आहोत ज्यात सण आणि उत्सव लोकांच्या आयुष्याचा नैसर्गिक भाग होते, असे ते म्हणाले. प्रत्येक सत्याचा विजय आणि प्रत्येक असत्याच्या पराजयाचा मानवतेचा संदेश जिवंत ठेवण्यात भारताचा हात कुणीही धरू शकत नाही, पंतप्रधान म्हणाले. दिवाळीचे दिवे म्हणजे भारताचे आदर्श, मूल्ये आणि तत्वज्ञानाची जिवंत उर्जा आहे. दिव्यांचा उजेड आणि त्याचा परिणाम भारताच्या सत्यमेव जयतेया मूलमंत्राचा, हाच संदेश अधोरेखित करते, पंतप्रधान म्हणाले.

उपनिषदाचे दाखले देऊन पंतप्रधान म्हणाले, सत्यमेव जयते नानरीतम सत्येन पंथा वितातो देवायानः, म्हणजे सत्याचाच विजय होतो आणि असत्याचा पराजय. आपल्या संतांच्या वचनांचे देखील पंतप्रधानांनी दाखले दिले. रामोराज्यमणी सदा विजयते म्हणजेच रामाच्या सद्वर्तनाचाच नेहमी विजय होतो रावणाच्या गैरवर्तनाचा नाही. दिव्यांच्या उर्जेवर बोलताना त्यांनी संतवचन उद्धृत करत पंतप्रधान म्हणले, दिपोज्योतिः परब्रह्म दिपःज्योती जनार्दन म्हणजे दिव्याचा उजेड ब्रह्मदेवापासून मिळतो. अध्यात्मिक ज्ञान भारताची प्रगती आणि उत्थान घडवून आणेल, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

रामचरित मानस मध्ये गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलेल्या गोष्टींचे सर्वांना स्मरण करून देण्याची संधी पंतप्रधानांनी घेतली आणि उद्धृत केले, जगत प्रकाश प्रकाशक रामू, म्हणजे भगवान राम हे संपूर्ण जगाला प्रकाश देणारे असून संपूर्ण जगासाठी दीपस्तंभासारखे आहेत. पंतप्रधानांनी नमूद केले, "हा दया आणि करुणेचा, मानवतेचा आणि सन्मानाचा, समता आणि दयाळूपणाचा प्रकाश आहे आणि तो सबका साथचा संदेश आहे."

पंतप्रधानांनी दिव्या विषयी अनेक वर्षांपूर्वी गुजरातीत लिहिलेल्या त्यांच्या 'दिया' या कवितेतील काही ओळी म्हणून दाखवल्या. कवितेचा भावार्थ उलगडताना ते म्हणाले कि दिवा हा आशा आणि उष्णता, अग्नी आणि आधार देतो. प्रत्येकजण उगवत्या सूर्याला वंदन करत असला तरी संध्याकाळच्या तिमिरात जो आधार बनतो तो दिवा. ते पुढे म्हणाले की, लोकांच्या मनात समर्पणाची भावना जागृत करताना अंधार घालवण्यासाठी दिवाच जळतो.

जेव्हा आपण स्वार्थापलीकडे विचार करतो, तेव्हा सर्वसमावेशकतेचा संकल्प आपोआपच त्यात अंतर्भूत होतो, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, जेव्हा आपल्या संकल्पना सिद्धीस जातात, तेव्हा आपण म्हणतो की ही सिद्धी माझ्यासाठी नाही, ती मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. दीपापासून दीपावलीपर्यंत, हे भारताचे तत्त्वज्ञान आहे, ही भारताची संकल्पना आहे आणि भारताची शाश्वत संस्कृती आहे. मध्ययुगीन आणि आधुनिक काळात भारताला अंधकारमय काळाच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागला असला तरी देशवासीयांनी कधीही दिवे लावणे थांबवले नाही आणि विश्वास निर्माण करणे कधीही सोडले नाही, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. कोरोनाच्या संकटात प्रत्येक भारतीय त्याच भावनेने दिवा घेऊन उभा राहिला आणि महामारीविरुद्धच्या भारताच्या लढ्याचे जग साक्षीदार होते याचा पुनरुच्चार त्यांनी केला. "भारताने भूतकाळातील प्रत्येक अंधारातून बाहेर पडून प्रगतीच्या मार्गावर आपल्या पराक्रमाचा प्रकाश पसरवला," असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

 

पार्श्वभूमी

सहाव्या दीपोत्सवात प्रथमच पंतप्रधान वैयक्तिकरित्या उत्सवाचा भाग बनतील. या प्रसंगी, 15 लाखाहून अधिक दीप (दिवे) प्रज्वलित केले जातील आणि विविध राज्यांतील विविध नृत्य प्रकारांसह पाच अॅनिमेटेड देखावे आणि अकरा रामलीला चे देखावे प्रदर्शित केले जातील.

 

***

S.Patil/R.Aghor/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870548) Visitor Counter : 170