पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईच्या जूहू किनाऱ्यावर आयोजित क्लिनथॉन ह्या स्वच्छता मोहिमेचे पंतप्रधानांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 12 SEP 2022 8:03PM by PIB Mumbai

 

मुंबईच्या जूहू चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या क्लिनथॉन ह्या स्वच्छता मोहिमेचे कौतूक करणारे डॉ जितेंद्र सिंह यांचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले असून, ह्या कामाचे त्यांनी कौतूक केले आहे. ह्या क्लिनथॉन मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक करत, आपले किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणे किती आवश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे.

"कौतुकास्पद...ह्या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्वांचे कौतूक आहे.

भारताला एक मोठा आणि अतिशय सुंदर किनारा लाभला असून, आपण  आपले किनारे स्वच्छ ठेवण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1858826) आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam