पंतप्रधान कार्यालय
हर घर तिरंगा अभियानाला मिळालेल्या अद्वितीय प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद आणि अभिमान
नागरिकांनी तिरंग्यासोबतचा फोटो शेअर करण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन
Posted On:
13 AUG 2022 9:40PM by PIB Mumbai
हर घर तिरंगा अभियानाला मिळालेल्या अद्वितीय प्रतिसादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या अभियानात समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा विक्रमी सहभाग आपण पाहत आहोत. तिरंग्यासोबतचा फोटो harghartiranga.com वर शेअर करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे.
पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची झलक देशभरातून आलेल्या छायाचित्राद्वारे ट्विटरवर दर्शवली आहे.
"#हर घर तिरंगा अभियानाला मिळालेल्या अद्वितीय प्रतिसादामुळे आनंद आणि अभिमान वाटतो. आम्ही विविध क्षेत्रातील लोकांचा विक्रमी सहभाग पाहत आहोत. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. harghartiranga.com वर तिरंग्यासोबत तुमचा फोटो देखील शेअर करा."
"आपल्या सर्वांना अभिमान वाटतो! #HarGharTiranga"
"नेत्रदीपक. #HarGharTiranga"
"#हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा देणाऱ्या या तरुणांचे मी कौतुक करतो." #HarGharTiranga movement"
"हे जलशक्ती आणि देशभक्तीचे उत्तम मिश्रण आहे! #HarGharTiranga"
"महान! अरुणाचल प्रदेशातील लोक त्यांच्या देशभक्तीच्या अतूट भावनेसाठी ओळखले जातात. #HarGharTiranga"
"तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघालेले चेन्नईतील एक प्रतिष्ठित स्थानक. या TL मध्ये इतरही चित्ताकर्षक छायाचित्रे आहेत... जरूर पहा. #HarGharTiranga"
आमच्या युवा शक्तीची उत्कृष्ट ऊर्जा आणि उत्कृष्ट एकत्रीकरण! हे असे प्रयत्न आहेत जे #HarGharTiranga ला खूप खास बनवतात.
देवभूमी उत्तराखंडमध्ये प्रचंड उत्साह! #HarGharTiranga
#HarGharTiranga अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण भारतभर उत्कृष्ट प्रयत्न सुरू आहेत.
खरंच, संपूर्ण भारतामध्ये #HarGharTiranga अभियानात प्रचंड उत्साह आहे.
या तरुणांची सकारात्मकता आणि जोश वाखाणण्याजोगा आहे. #HarGharTiranga
आपला अनमोल वारसा आणि तिरंगा! हा प्रयत्न #HarGharTiranga अभियानाला नक्कीच बळ देईल
हर घर तिरंगा’ अभियानाबाबत @aajtak चे हे कलात्मक सृजन लोकांना उत्साहित करणारे आहे. #HarGharTiranga
हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय तिरंग्याशी किती मनापासून जोडलेला आहे याची झलक दाखवतो. खरोखर हृदयस्पर्शी! #HarGharTiranga
***
Jaydevi PS/S. Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851633)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam