पंतप्रधान कार्यालय
जागतिक हत्ती दिनानिमित्त पंतप्रधानांनी हत्ती संवर्धनकर्त्यांच्या परिश्रमांची केली प्रशंसा
गेल्या 8 वर्षांत हत्तींसाठी संरक्षित क्षेत्रांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
12 AUG 2022 11:03AM by PIB Mumbai
जागतिक हत्ती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हत्ती संवर्धनकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले आहे. गेल्या 8 वर्षांत हत्तींसाठी संरक्षित क्षेत्रांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटरसंदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“जागतिक हत्ती दिनानिमित्त हत्तीच्या संरक्षणासाठी करत असलेल्या आमच्या कटीबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. तुम्हाला हे जाणून तुम्हाला आनंद होईल की
संपूर्ण आशियातील हत्तींपैकी सुमारे 60% हत्तींचे निवासस्थान भारत आहे. गेल्या 8 वर्षांत हत्तींसाठी संरक्षित क्षेत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. हत्तींच्या संवर्धनात सहभाग असलेल्या सर्वांचेही मी कौतुक करत आहे.”
"हत्ती संवर्धनातील हे यश मानव-प्राणी यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी, भारतात सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांच्या संदर्भात तसेच पर्यावणासंदर्भातील संवेदना वाढवण्यासाठी स्थानिक समुदाय आणि त्यांच्या पारंपारिक ज्ञानाला एकत्रित करण्याच्या दृष्टीने पहाण्याची आवश्यकता आहे."
*****
SonalT/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851161)
Visitor Counter : 184
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam