पंतप्रधान कार्यालय

चेन्नई येथे झालेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या पुरूष ब संघाचे आणि भारतीय महिलांच्या अ संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवल्याबद्दल पंतप्रधानांनी तामिळनाडूतील जनतेचे आणि सरकारचे केले कौतुक

Posted On: 10 AUG 2022 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

चेन्नई येथे झालेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या पुरूष ब संघाचे आणि भारतीय महिलांच्या अ संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. 44 व्या बुद्धिबळ  ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवल्याबद्दल पंतप्रधानांनी तामिळनाडूतील जनतेचे आणि सरकारचे कौतुक केले. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला जगासमोर आपली उत्कृष्ट संस्कृती आणि आदरातिथ्य दाखविता आले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

ते ट्विट संदेशात म्हणाले,

चेन्नई येथे नुकत्याच  झालेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने उत्साहवर्धक कामगिरी केली. कांस्यपदक जिंकल्याबद्दल मी भारत ब संघ (पुरुष) आणि भारत अ संघ (महिला) यांचे अभिनंदन करतो. हे भारतातील बुद्धिबळाच्या भवितव्यासाठी शुभ आहे.

बोर्ड मेडल जिंकणाऱ्या गुकेश डी, निहाल सरीन, अर्जुन एरिगाईसी, प्रज्ञानंद , वैशाली, तानिया सचदेव आणि दिव्या देशमुख यांचे मी अभिनंदन करतो. उल्लेखनीय धैर्य आणि दृढता दर्शविलेले हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

तामिळनाडूचे लोक आणि सरकार 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उत्कृष्ट यजमान ठरले. जगाचे स्वागत केल्याबद्दल आणि आमची उत्कृष्ट संस्कृती आणि आदरातिथ्य दाखवल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करू इच्छितो.

 

S.Kulkarni/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850674) Visitor Counter : 148