पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविताना शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी दाखविलेली हिंमत आणि चिकाटी यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविणाऱ्या शरथ कमल आणि श्रीजा अकुला या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“एकमेकांसह स्पर्धेत खेळणे आणि जिंकणे याची एक वेगळीच लज्जत आहे. @sharathkamal1 आणि श्रीजा अकुला या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवत टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारातील प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्यांनी दाखविलेली हिंमत आणि चिकाटी यांचे मी कौतुक करतो. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमधील ज्या प्रकारांमध्ये शरथ याने भाग घेतला त्या प्रत्येक प्रकारात अंतिम फेरीपर्यंत पोहोचून त्याने बजावलेली कामगिरी अत्युत्कृष्ट आहे.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1849775)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam