पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या सोनल पटेलचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2022 8:38AM by PIB Mumbai

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल सोनल पटेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ज्यावेळी गुणवत्ता, जिंकण्याची मानसिकता आणि जिद्द यांचा संगम होतो तेव्हा काहीच अशक्य नसते. पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या सोनल पटेलने हे सिद्ध केले आहे. तिचे याबद्दल अभिनंदन. आगामी काळात तिची वेगळी ओळख अशाच प्रकारे निर्माण होत राहो अशी मी कामना करतो.#Cheer4India"

*****

SonalT/ShaileshP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1849336) आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam