पंतप्रधान कार्यालय
भारताच्या उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2022 10:03PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“पक्षमर्यादांच्या पलीकडे जाऊन निर्णायक पाठिंब्यासह जगदीप धनखड यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ते उपराष्ट्रपती म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य करतील असा विश्वास मला वाटतो. @jdhankhar1 यांची बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता यांचा आपल्या देशाला प्रचंड लाभ होईल.”
“जगदीप धनखड यांना मतदान करणाऱ्या सर्व खासदारांचे मी आभार मानतो. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतानाच, कायद्याचे उत्कृष्ट ज्ञान आणि बौद्धिक संपदा असणारा शेतकरी पुत्र देशाला उपराष्ट्रपती म्हणून लाभला आहे याचा आम्हांला अभिमान वाटतो.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849217)
आगंतुक पटल : 339
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam