पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2022 6:20PM by PIB Mumbai
बर्मिंगहम इथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत, पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविनाश साबळे याचे अभिनंदन केले आहे. अविनाश साबळेच्या लष्करातील नोकरीसंदर्भात त्याच्याशी पंतप्रधानांनी नुकताच केलेला संवाद देखील शेअर केला आहे.
“अविनाश साबळे एक उत्तम युवा खेळाडू आहे. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले याचा मला अतिशय आनंद आहे. आमचा नुकताच झालेला संवाद मी इथे शेअर करत आहे. या संवादादारम्यान त्याने लष्करी नोकरीतले त्याचे अनुभव आणि आयुष्यातल्या इतर अनेक अडथळ्यांवर मात कशी केली याबद्दल सांगितलं आहे. त्याचा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.”
असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849186)
आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam