पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिस खेळात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून जी. सत्यन, हरमीत देसाई, शरत कमल आणि सनील शेट्टी यांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2022 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिस खेळात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल जी. सत्यन, हरमीत देसाई, शरत कमल आणि सनील शेट्टी यांचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"टेबल टेनिसमधील नेत्रदीपक कामगिरी! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल जी सत्यन, हरमीत देसाई, शरत कमल आणि सनील शेट्टी यांच्या स्फूर्तिशील संघाचे अभिनंदन. या संघाने उच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत, मग ते कौशल्य असो किंवा दृढनिश्चय. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा."
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1847629)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam