आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
ब्राझीलमधील बीएम-एसईएएल -11 या प्रकल्पाच्या विकासासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेडकडून अतिरिक्त गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
27 JUL 2022 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने, ब्राझीलमधील बीएम-एसईएएल -11 सवलत प्रकल्पाच्या विकासासाठी,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (BPCL) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेडकडून (BPRL) 1,600 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 12,000 कोटी रुपये) च्या अतिरिक्त गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने खालील गोष्टींना देखील मान्यता दिली:
- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड मध्ये अधिकृत भाग भांडवल आणि इक्विटी गुंतवणुकीची मर्यादा रु. 15,000 कोटींवरून रु. 20,000 कोटींपर्यंत वाढवणे (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे वेळोवेळी खरेदी करण्यासाठी).
- भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड इंटरनॅशनल BV द्वारे इंटरमीडिएट WOS द्वारे इंटरनॅशनल BV ब्राझील पेट्रोलिओ लिमिटा मधील इक्विटी गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या रु. 5,000 कोटींवरून रु. 15,000 कोटींपर्यंत वाढविण्यास अधिकृत करणे म्हणजे रु. 10,000 कोटींची वाढ.
2026-27 पासून बीएम-एसईएएल -11 प्रकल्पातून उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे.
हे यामध्ये सहाय्य करेल:
- भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी इक्विटी तेल क्षेत्रात प्रवेश.
- भारताच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात विविधता आणणे आणि भारतीय तेल कंपन्यांनी ब्राझीलमधून अधिक कच्चे तेल मिळविण्यात स्वारस्य व्यक्त केले आहे.
- ब्राझीलमध्ये भारताचे पाऊल भक्कम करणे, ज्यामुळे शेजारील लॅटिन अमेरिकन देशांमध्ये व्यवसायाचे मार्ग खुले होतील.
- दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करणे.
या सवलतीमध्ये 40% वाटा सहभागी भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेडचा तर संचालक म्हणून ब्राझीलची राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोब्रासचा 60% वाटा असेल.
भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड 2008 पासून ब्राझीलमधील या प्रकल्पाच्या शोध आणि विकासाशी संबंधित आहे.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845575)
Visitor Counter : 251
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam