पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान उद्या18 जुलै रोजी निवो NIIO स्वावलंबन संमेलनाला संबोधित करणार


भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञान वापरला बळकटी देणाऱ्या स्प्रिंट (‘SPRINT) आव्हांनाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

Posted On: 17 JUL 2022 12:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022

 

पंतप्रधान उद्या18 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजता डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केन्द्र नवी दिल्ली येथे एन आय आय ओ (Naval Innovation and Indigenisation Organisation) अर्थात नौदल नवोन्मेश  आणि स्वदेशी निर्मिती  संघटनेच्या "स्वावलंबन"संमेलनाला संबोधित करणार 

आत्मनिर्भर भारत योजनेमुळे लष्करी क्षेत्रात आत्मवाविश्र्वास वाढायला मोठी मदत मिळत आहे. हीच बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमात पंतप्रधान भारतीय नौदलात स्थनिक बनावटीच्या निर्मितीसाठी  तंत्रज्ञान वापरला बळकटी देण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या‘ ‘SPRINT Challenges’ आव्हानांवर मार्गदर्शन करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नीवो NIIO आणि लष्करी संशोधन संघटना (DIO) यांच्या सहयोगाने यावेळी भारतीय नौदलात कमीत कमी 75 भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान किंवा लष्करी साधने समाविष्ट केले जातील. या संयुक्तिक उपक्रमाला स्प्रिंट SPRINT (सपोर्टिंग पोल - वाल्टिंग इन आर अंँड डी थ्रू आयडेक्स, नीवो अँड टीडँक)(Supporting Pole-Vaulting in R&D through iDEX, NIIO and TDAC) असे म्हटले जाणार आहे.

लष्करी क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनण्यासाठी भारतीय उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणुक करणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. या दोन (18-19 जुलै) दिवसाच्या परिसंवादात उद्योग क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सेवा, आणि सरकारी क्षेत्रे एकत्र येऊन भारतीय नौदलात कशाप्रकारे भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान आत्मसात करू शकू यावर आपले विचार मांडतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यावर देखील चर्चा करतील. या परिसंवादात संशोधन, स्थानिक बनावटीच्या निर्मितीविषयक, विविध शस्त्रे आणि साधने, आणि विमानचालन या विषयावर विशेष सत्रे आयोजित केले जातील. या परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी हिंद महासागर क्षेत्र आणि केंद्रसरकारचे सागर SAGAR सिक्यूरेटी अँड ग्रोथ फाँर आँल इन द रिजन (Security and Growth for All in the Region) म्हणजेच या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.

 
* * *

Jaydevi PS/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842145) Visitor Counter : 215