पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचे नागरिकांना 26 जून 2022 रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमावर आधारित नमो अ‍ॅप वरील प्रश्नमंजूषेत भाग घेण्याचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2022 9:10PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 26 जून  2022 रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमावर आधारित नमो अ‍ॅप वरील प्रश्नमंजूषेत भाग घेण्याचे आवाहन केले आहे.

यावेळच्या ‘मन की बात’ मध्ये अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती, ‘कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती’ करण्याच्या दिशेने केलेले सामूहिक प्रयत्न, आपल्या क्रीडापटूंचे कर्तृत्व आणि अशा अनेक

वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे :

या महिन्याच्या  #MannKiBaat, मन की बात मध्ये आपण अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती, ‘कचऱ्यापासून संपत्तीची निर्मिती’ करण्याच्या दिशेने केलेले सामूहिक प्रयत्न, आमच्या क्रीडापटूंचे

कर्तृत्व आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण  विषयांचा समावेश केला. नमो अ‍ॅपवर या भागावर आधारित प्रश्नमंजुषा आहे. त्यात आवश्य भाग घ्या.

***

S.Thakur/B.Sontakke/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1838162) आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Bengali , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam