अर्थ मंत्रालय
आझादी का अमृत आयकॉनिक वीक चा भाग म्हणून सीबीआयसी उद्या ‘अमली पदार्थ विध्वंस दिन’ साजरा करणार
मोहिमेअंतर्गत देशभरातील 14 ठिकाणी सुमारे 42,000 किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट केले जाणार
Posted On:
07 JUN 2022 7:11AM by PIB Mumbai
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय वित्तमंत्रालय ‘आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीक’ असं विशेष सप्ताह साजरा करत आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभाग (सीबीआयसी) तर्फे याच आयकॉनिक वीक चा भाग म्हणून, उद्या ‘अंमली पदार्थ विध्वंस दिन’साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत, देशभरातील 14 ठिकाणी सुमारे 42,000 किलो अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत.
केंद्रीय वित्त आणि कार्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन, आभासी माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होतील. एकाच वेळी गुवाहाटी, लखनौ, मुंबई, मुंदरा/कांडला, पाटणा, सिलीगुडी या ठिकाणी हे अंमली पदार्थ नष्ट केले जातील. त्यानंतर वित्तमंत्री अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करतील.
***
Jaydevi PS/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831732)
Visitor Counter : 279