पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आझाद हिंद फौजेचे (इंडियन नॅशनल आर्मी- आय एन ए) दिग्गज अंजलाई पोन्नुसामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

Posted On: 01 JUN 2022 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील प्रतिष्ठित आझाद हिंद फौजेच्या (इंडियन नॅशनल आर्मीच्या) अंजलाई पोननुसामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

"मलेशियातील प्रतिष्ठित इंडियन नॅशनल आर्मीच्या अंजलाई पोननुसामी जी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे शौर्य आणि प्रेरणादायी भूमिका नेहमी आमच्या स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे. "

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830285) Visitor Counter : 186