अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मे 2022 मध्ये 1,40,885 कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलन; वार्षिक 44% वाढ


जीएसटी लागू झाल्यापासून जीएसटी संकलनाने चौथ्यांदा आणि मार्च 2022 पासून सलग तिसऱ्या महिन्यात 1.40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला

Posted On: 01 JUN 2022 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2022

 

मे 2022 मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,40,885 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,036 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,001 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 73,345 कोटी  रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 37469  कोटींसह) आणि उपकर 10,502 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित  केलेल्या 931 कोटी रुपये सह ) यांचा समावेश आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला  27,924 कोटी रुपये  आणि  एसजीएसटीला  23,123 कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर मे 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 52,960 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 55,124 कोटी रुपये आहे.याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने 31.05.2022 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 86,912 कोटी रुपये जीएसटी भरपाई देखील जारी केली आहे.

मे 2022 चा जीएसटी  महसूल हा  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 44% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 43% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी  याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 44% अधिक आहे.

जीएसटी लागू  झाल्यापासून मासिक जीएसटी संकलनाने चौथ्यांदा तर  मार्च 2022 पासून सलग तिसऱ्या महिन्यात 1.40 लाख कोटी रुपयांचा  टप्पा ओलांडला  आहे . मे महिन्यातील संकलन, जे एप्रिलच्या पहिल्या महिन्याच्या परताव्याशी संबंधित आहे , ते एप्रिलमध्ये  नेहमीच कमी असते.  मात्र तरीही  मे 2022 मध्ये, जीएसटी  महसूलाने 1.40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल 2022 मध्ये  एकूण ई-वे बिलांची संख्या 7.4 कोटी होती, जी मार्च 2022 मधील  7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा 4% कमी आहे.

एप्रिल 2021 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या  जीएसटी महसुलाची  राज्यनिहाय  आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दाखवला आहे. मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

State-wise growth of GST Revenues during May 2022[1]

State

May-21

May-22

Growth

Jammu and Kashmir

232

372

60%

Himachal Pradesh

540

741

37%

Punjab

1,266

1,833

45%

Chandigarh

130

167

29%

Uttarakhand

893

1,309

46%

Haryana

4,663

6,663

43%

Delhi

2,771

4,113

48%

Rajasthan

2,464

3,789

54%

Uttar Pradesh

4,710

6,670

42%

Bihar

849

1,178

39%

Sikkim

250

279

12%

Arunachal Pradesh

36

82

124%

Nagaland

29

49

67%

Manipur

22

47

120%

Mizoram

15

25

70%

Tripura

39

65

67%

Meghalaya

124

174

40%

Assam

770

1,062

38%

West Bengal

3,590

4,896

36%

Jharkhand

2,013

2,468

23%

Odisha

3,197

3,956

24%

Chattisgarh

2,026

2,627

30%

Madhya Pradesh

1,928

2,746

42%

Gujarat

6,382

9,321

46%

Daman and Diu

0

0

153%

Dadra and Nagar Haveli

228

300

31%

Maharashtra

13,565

20,313

50%

Karnataka

5,754

9,232

60%

Goa

229

461

101%

Lakshadweep

0

1

148%

Kerala

1,147

2,064

80%

Tamil Nadu

5,592

7,910

41%

Puducherry

123

181

47%

Andaman and Nicobar Islands

48

24

-50%

Telangana

2,984

3,982

33%

Andhra Pradesh

2,074

3,047

47%

Ladakh

5

12

134%

Other Territory

121

185

52%

Center Jurisdiction

141

140

0%

Grand Total

70,951

1,02,485

44%

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 


(Release ID: 1830086) Visitor Counter : 315