पंतप्रधान कार्यालय
जपानमधील भारतीय समुदायाशी पंतप्रधानांनी साधला संवाद
Posted On:
23 MAY 2022 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2022
जपानमधील भारतीय समुदायाच्या 700 पेक्षा अधिक सदस्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2022 रोजी संवाद साधला.
या कार्यक्रमापूर्वी, पंतप्रधानांनी भारत आणि जपानदरम्यान सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहनपर काम करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. यामध्ये इंडोलॉजिस्ट म्हणजे भारताच्या इतिहास-संस्कृती-तत्त्वज्ञान आदींचा अभ्यास करणारे लोक, खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश होता. तसेच जपानमधील 'प्रवासी (अनिवासी) भारतीय पुरस्कार' विजेत्या लोकांच्या भेटीही त्यांनी घेतल्या. जपानमधील भारतीय समुदायात चाळीस हजारापेक्षा अधिक लोकांचा समावेश आहे.
भारतीय समुदायाच्या व्यक्तींकडील कौशल्ये, प्रतिभा आणि उद्योजकता या गुणांचे व मातृभूमीशी जिव्हाळ्याचे नाते जपण्याच्या वृत्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे दाखले देऊन पंतप्रधानांनी भारत आणि जपानदरम्यानच्या सखोल सांस्कृतिक संबंधांचे ठाशीवपणे गुणगान केले. तसेच, गेल्या काही वर्षांत भारतात घडून आलेल्या विविध सामाजिक-आर्थिक घडामोडी व सुधारणा- त्यांनी अधोरेखित केल्या. यामध्ये विशेषत्वाने पायाभूत सुविधा, प्रशासन, हरित विकास आणि डिजिटल क्रांती या क्षेत्रांतील प्रगतीचा समावेश होता. 'भारत चलो, भारत से जुडो' म्हणजेच 'भारतात या, भारताशी जोडून घ्या' या मोहिमेत सहभागी होऊन ती पुढे चालविण्याचे आवाहनही त्यांनी भारतीय समुदायाला केले.’
S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827774)
Visitor Counter : 179
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam