पंतप्रधान कार्यालय
एनईसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
Posted On:
23 MAY 2022 2:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनईसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एन्डो यांची 23 मे 2022 रोजी टोकियोमध्ये भेट घेतली. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील, विशेषतः चेन्नई-अंदमान आणि निकोबार द्वीप समूह (CANI) आणि कोची-लक्षद्वीप बेटे (KLI) येथे सुरु केलेल्या ऑप्टीकल फायबर केबल प्रकल्पांमधील एनईसी च्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन (PLI) योजनेतील गुंतवणुकीच्या संधींचा देखील प्रधानमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.
औद्योगिक विकास, कर संरचना आणि कामगार या आणि अन्य क्षेत्रांमधे व्यवसाय सुलभतेसाठी भारताने हाती घेतलेल्या विविध सुधारणांबाबत त्यांनी चर्चा केली. भारतामधील नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संधींबाबत देखील त्यांनी चर्चा केली.
NC/R.Agashe/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827603)
अभ्यागत कक्ष : 264
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam