पंतप्रधान कार्यालय

भारत आणि जपान यांच्यातील सळसळत्या, उत्साही संबंधांविषयी पंतप्रधानांचा जपानमधल्या वर्तमानपत्रामध्‍ये लेख प्रसिध्द


Posted On: 23 MAY 2022 9:07AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधल्या एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला असून तो ऑप एड पानावर प्रकाशित झाला आहे पंतप्रधान  मोदी सध्‍या जपानच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

या लेखाविषयी पंतप्रधान मोदी यांनी ट्विटव्दारे माहिती दिली;

‘’ भारत आणि जपान यांच्यामधल्या सळसळत्याउत्साही संबंधांविषयी   ऑप एड पानावर लेखन केले आहे. आमची भागीदारी ही  शांततास्थैर्य आणि  समृध्दी यांच्यासाठी आहे. या लेखामध्ये मी उभय देशाच्या मैत्रीच्या प्रवासाला 70 वैभवशाली वर्ष पूर्ण झाली आहेत, यावर विशेष भर दिला आहे.@Yomiuri_Online"

‘’कोविड नंतरच्या काळात भारत- जपान अधिक जवळचे आणि महत्‍वपूर्ण क्षेत्रात   सहकार्य करणारे देश आहेत. आपली राष्‍ट्रे लोकशाही मूल्यांसाठी दृढपणाने वचनबद्ध आहेत. एकत्रितपणे आपण स्थिर आणि सुरक्षित इंडो- पॅसिफिक क्षेत्राचे प्रमुख आधारस्तंभ आहोत. आपण विविध बहुपक्षीय मंचावरही तितक्याच जवळिकतेने कार्य करीत आहोत, याचा मला आनंद आहे.’’

‘’ गुजरातचे मुख्‍यमंत्री म्हणून कार्यरत असल्यापासून मला जपानी लोकांशी नियमित संवाद साधण्‍याची संधी मिळाली आहे. जपानने विकासाच्या दिशेने  वाटचाल करताना चढलेल्या पाय-या नेहमीच वाखाणण्‍यासारख्‍या आहेत.  पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवसंकल्पना, स्टार्टअप्स आणि इतर ब-याच महत्वाच्या क्षेत्रामध्‍ये जपान आणि भारत यांच्यामध्‍ये भागीदारी आहे.’’  

***

JPS/SB /DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827563) Visitor Counter : 192