पंतप्रधान कार्यालय

1857 च्या लढ्यात अतुलनीय धैर्याचे दर्शन घडवणाऱ्या सर्वांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 10 MAY 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2022

 

1857 च्या लढ्यात अतुलनीय धैर्याचे दर्शन घडवणाऱ्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"ऐतिहासिक पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला 1857 मधे याच दिवशी सुरुवात झाली, याने जनतेत देशभक्तीची भावना प्रज्वलित केली आणि वसाहतवादी राजवट कमकुवत करण्यात योगदान दिले. 1857 च्या लढ्यात अतुलनीय धैर्याचे दर्शन घडवणाऱ्या सर्वांना मी आदरांजली वाहतो."

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824128) Visitor Counter : 216