पंतप्रधान कार्यालय
कोपनहेगन येथील भारतीय समुदायांशी पंतप्रधानांचा संवाद
प्रविष्टि तिथि:
03 MAY 2022 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्यासह कोपनहेगन येथील बेल्ला केंद्र येथे भारतीय समुदायाला संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक,विविध व्यावसायिक आणि व्यापार क्षेत्रातील भारतीय समुदायाचे एक हजारहून अधिक सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी या प्रसंगी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्या स्नेहपूर्ण वागणुकीची आणि भारतीयांप्रती त्यांना असलेल्या आदराची प्रशंसा केली. हे दोन्ही देश हरित विकासाच्या अभिनव उपाययोजना शोधून काढण्यासाठी एकत्र येऊन काम करू शकतात यावर त्यांनी भर दिला. भारतीय समुदायाने डेन्मार्कमध्ये स्वीकारलेल्या सकारात्मक भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना भारताच्या आर्थिक क्षमतेचे अधिक ठळकपणे दर्शन घडविले आणि भारत-डेन्मार्क सहकार्य अधिक वाढविण्याच्या दृष्टीने प्रस्तावांना आमंत्रण दिले.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1822645)
आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam