पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 एप्रिल रोजी जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
28 APR 2022 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम द्वारा आयोजित जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेचे 29 एप्रिल रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे.
पाटीदार समाजाच्या सामाजिक - आर्थिक उन्नतीसाठी सरदारधामने ‘मिशन 2026’ अंतर्गत जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शिखर परिषदेचे आयोजन केले जात आहे. पहिल्या दोन शिखर परिषदा गांधीनगर इथे 2018 आणि 2020 मध्ये आयोजीत करण्यात आल्या होत्या, आणि ही शिखर परिषद सुरत इथे आयोजित केली जात आहे. या वर्षीच्या जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेची संकल्पना ‘आत्मनिर्भर समाज ते आत्मनिर्भर गुजरात आणि भारत’ ही आहे. या शिखर परिषदेचा मुख्य उद्देश आहे पाटीदार समाजातील लघु, मध्यम आणि मोठे उद्योजक एकत्र आणून उदयोन्मुख उद्यमींना मदत आणि त्यांचे संगोपन करणे तसेच त्यांना प्रशिक्षण देणे, सुशिक्षीत युवकांना नोकरी मिळविण्यात सहाय्य करणे. ही तीन दिवसीय शिखर परिषद 29 एप्रिल ते 1मे दरम्यान आयोजित केली जाईल यात सरकारचे उद्योग धोरण, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, नवोन्मेष या विषयांवर चर्चा होईल.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1821091)
आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam