मंत्रिमंडळ

भारतीय रोखे व विनिमय मंडळ आणि कॅनडाचा मैनीटोबा रोखे आयोग यांच्यातील द्विपक्षीय सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Posted On: 13 APR 2022 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सेबी अर्थात भारतीय रोखे व विनिमय मंडळ आणि कॅनडाचा मैनीटोबा रोखे आयोग यांच्यातील द्विपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास परवानगी दिली.

लाभ:

  • या सामंजस्य करारामुळे रोखे नियमन करण्याच्या क्षेत्रात दोन्ही देशांच्या दरम्यानच्या सहकारी संबंधांना औपचारिक आधार मिळेल, परस्पर सहकार्य सुलभ होईल, पर्यवेक्षण संबंधी कार्यांची कामगिरी अधिक प्रभावशाली होण्यामध्ये योगदान मिळेल, या क्षेत्रातील तंत्रज्ञानासंबंधी माहिती समजून घेण्यात मदत मिळेल आणि रोखे बाजारांचे नियंत्रण करणारे नियम तसेच कायदे अधिक परिणामकारक पद्धतीने लागू करणे शक्य होईल. 
  • या सामंजस्य करारामुळे मैनीटोबा आयोगाशी संबंधित गुंतवणूकदार सेबीचे अधिकृत परदेशी गुंतवणूकदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र ठरतील.

परिणाम:     

कॅनडाच्या मैनीटोबा प्रांतातील संस्थांना सेबीचे अधिकृत परदेशी गुंतवणूकदार म्हणून नोंदले जाण्याची इच्छा आहे. आणि यासाठीची एक पूर्वअट अशी आहे की, परदेशातील अथवा परप्रांतातील रोखे बाजार नियामकाने आंतरराष्ट्रीय रोखे आयोग संघटनेच्या बहुविध सामंजस्य करारात सहभागी असले पाहिजे. सेबीशी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होणे मैनीटोबामधील संस्थांना सेबीचे अधिकृत परदेशी गुंतवणूकदार म्हणून मान्यता मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मैनीटोबामधील जवळपास 2,665 कोटी रुपयांची मालमत्ता ज्यांच्या ताब्यात आहे अशा सुमारे 20 गुंतवणूकदार संस्थांना या द्विपक्षीय कराराचा लाभ मिळेल आणि या संस्था भारतीय बाजारांमध्ये पैसे गुंतविण्यासाठी पात्र ठरतील.

 

   S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1816456) Visitor Counter : 200