वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच, जानेवारी-मार्च 2022 दरम्यान देशांतर्गत पेटंट दाखल करण्याच्या संख्येने भारतातील आंतरराष्ट्रीय पेटंट दाखल करण्याच्या संख्येला टाकले मागे


भारतातील बौद्धीक संपदा नोंदणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी डीपीआयआयटीने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पीयूष गोयल यांनी केली प्रशंसा

Posted On: 12 APR 2022 10:11AM by PIB Mumbai

इंटेल्युक्चुअल प्रॉपर्टी इनोव्हेशन इकोसिस्टम अर्थात  बौद्धीक संपदा नवोन्मेषी परिसंस्थेसंदर्भात भारताने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदाच, जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत  देशांतर्गत पेटंट दाखल करण्याच्या संख्येने भारतातील आंतरराष्ट्रीय पेटंट दाखल करण्याच्या संख्येला मागे टाकले आहे.  एकूण 19796 पेटंट अर्ज दाखल झाले, पैकी 10706 भारतीय अर्जदारांनी दाखल केले तर 9090 गैर-भारतीय अर्जदारांनी दाखल केले.  हे खालीलप्रमाणे दर्शविले जाते:

आलेख: भारतीय अर्जदाराने दाखल केलेले त्रैमासिक-निहाय पेटंट अर्ज आणि गैर-भारतीय अर्जदारांनी दाखल केलेले अर्ज.

Image

डीपीआयआयटीने  भारतातील आयपीआर अर्थात  बौद्धीक संपदा नोंदणी  व्यवस्था बळकट करण्यासाठी नवोन्मेषता वाढवून आणि अनुपालनाचा भार कमी करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री  पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. या प्रयत्नांमुळे एकीकडे आयपीआर अर्ज दाखल करण्याची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे आयपी कार्यालयांमध्ये पेटंट अर्ज प्रलंबित राहणे कमी झाले आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या  (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) अव्वल 25 राष्ट्रांमध्ये मुसंडी मारण्याच्या भारताच्या   महत्त्वाकांक्षी लक्ष्याकडे हे आणखी एक पाऊल जवळ घेऊन जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

पेटंट दाखल करण्याचे प्रमाण 2014-15 मधील 42763 वरून 2021-22 मध्ये 66440 पर्यंत वाढले आहे, 7 वर्षांच्या कालावधीत त्यात 50% पेक्षा जास्त वाढ झाली.

2014-15 (5978) च्या तुलनेत 2021-22 (30,074) मध्ये पेटंट मंजूरीत जवळपास पाच पट वाढ झाली. पेटंट परीक्षणाचा कालावधी डिसेंबर 2016 मध्ये 72 महिन्यांवरून कमी होऊन सध्या 5-23 महिन्यांपर्यंत आला आहे, विविध तांत्रिक क्षेत्रांसाठीच्या 2015-16 मधील 81व्या क्रमांकाच्या तुलनेत 2021 मध्ये भारताचा जागतिक नवोन्मेष निर्देशांक 46व्या क्रमांकावर (+35 मानांकन वाढ) पोहचला आहे.

 

आलेख: वर्षनिहाय पेटंट अर्ज दाखल आणि मंजूर करणे 

 

*******

 

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815948) Visitor Counter : 338