मंत्रिमंडळ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना  महागाई भत्त्याचा आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा निधीचा  01.01.2022 पासून देय अतिरिक्त हप्ता वितरित करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 30 MAR 2022 5:20PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा निधीचा  (डीआर)  01.01.2022  पासून देय असलेला  अतिरिक्त हप्ता  वितरित करायला मान्यता दिली आहे. दरवाढीची भरपाई करण्याच्या दृष्टीने, या माध्यमातून  मूळ वेतन/निवृत्तीवेतनासाठी असलेल्या  31% या विद्यमान दरामध्ये  3% वाढ दर्शवण्यात आली आहे.

7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित  ही वाढ स्वीकृत सूत्रांनुसार आहे.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा निधी  या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर प्रतिवर्ष  एकत्रित 9,544.50 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. याचा फायदा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना  होणार आहे.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1811553) Visitor Counter : 372