पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

परीक्षा पे चर्चा' बाबत लोकांमध्ये असलेल्या उत्साहाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 30 MAR 2022 10:05AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या परीक्षा पे चर्चासाठी मौल्यवान सूचना आणि अनुभव सामायिक करतयासंदर्भात   लाखो लोकांनी दाखवलेल्या  उत्साहाचे कौतुक केले आहे . परीक्षा पे चर्चामध्ये  योगदान दिलेल्या  विद्यार्थीपालक आणि शिक्षकांचेही त्यांनी आभार मानले.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"या वर्षीच्या परीक्षा पे चर्चाला  अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.  लाखो लोकांनी त्यांच्या  मौल्यवान सूचना  आणि अनुभव सामायिक केले आहेत. मी त्या सर्व विद्यार्थीपालक आणि शिक्षकांचे आभार मानतो .

एप्रिलच्या कार्यक्रमाची  उत्सुकतेने वाट पाहत  आहे."

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1811291) Visitor Counter : 170