पंतप्रधान कार्यालय
भारताने निश्चित केलेले 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तूंच्या निर्यातीचे महत्त्त्वाकांक्षी लक्ष्य गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी देशातील शेतकरी, विणकर, एमएसएमई उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदारांचे केले अभिनंदन
Posted On:
23 MAR 2022 9:58AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 मार्च 2022
भारताने निश्चित केलेले 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तूंच्या निर्यातीचे महत्त्त्वाकांक्षी लक्ष्य गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी, विणकर, एमएसएमई उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदारांचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“भारताने 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तूंच्या निर्यातीचे महत्त्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आणि आतापर्यंतच्या काळात प्रथमच हे लक्ष्य गाठले. या यशाबद्दल मी आपले शेतकरी, विणकर, एमएसएमई उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदारांचे अभिनंदन करतो.
आत्मनिर्भर भारत साकार करण्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. #LocalGoesGlobal"
****
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808539)
Visitor Counter : 217
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada