आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्याचे भारत सरकारकडून प्रयत्न


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, युक्रेनमधून परत येत असलेल्या भारतीयांसाठी विविध सवलती जाहीर

भारतीय नागरिकांसाठी प्रि -बोर्डिंग नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरण प्रमाणपत्र अटी शिथिल, एअर-सुविधा पोर्टलवर प्रस्थानपूर्व कागदपत्रे अपलोड करण्यातूनही सूट

जर एखादा प्रवासी आगमनापूर्व आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करू शकत नसेल किंवा ज्यांनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले नसेल, त्यांना भारतात आल्यानंतर 14 दिवस स्वतःच्या आरोग्याची स्वत: तपासणी करणे सुरू ठेवण्याच्या सूचनेबरोबरच आगमनानंतर त्यांचे नमुने सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

28 फेब्रुवारी 2022 पर्यंत, युक्रेनमधून 1156 भारतीय मायदेशी परतले असून एकाही प्रवाशाला अलगीकरणात ठेवलेले नाही

Posted On: 28 FEB 2022 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसेच गृह मंत्रालयाच्या निकट सहकार्याने युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अनिवार्य आंतरराष्ट्रीय प्रवास मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले असून मानवतावादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील सवलतींना परवानगी दिली आहे:-

  • सध्याच्या 'भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये' नमूद केल्यानुसार अनिवार्य आवश्यकता (प्री-बोर्डिंग निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल किंवा संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र) पूर्ण करत नसलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी प्रस्थानापूर्वी ही कागदपत्रे एअर -सुविधा पोर्टलवर अपलोड करण्यातून सूट देण्यात आली आहे.
  • तसेच, ज्या व्यक्तींनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले आहे (प्रस्थान/लसीकरण केलेला देश कुठलाही असो) त्यांना आगमनानंतर पुढील 14 दिवसांसाठी त्यांच्या आरोग्यावर स्वतः देखरेख ठेवण्याच्या सूचनेसह विमानतळ सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • जर एखादा प्रवासी आगमनापूर्व आरटी पीसीआर चाचणी अहवाल सादर करू शकत नसेल किंवा ज्यांनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले नसेल, त्यांना 14 दिवस त्यांच्या आरोग्याची स्वत: तपासणी करण्याच्या सूचनेसह भारतात आगमनानंतर त्यांचे नमुने सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर  चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास निर्धारित प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय नियमांचे त्यांना पालन करावे लागेल.

युक्रेनमधील राजकीय संकटात भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा समुदाय अडकला आहे. युक्रेनमध्ये जारी करण्यात आलेल्या नोटिस टू एअरमन किंवा नोटिस टू एअर मिशन्स (NOTAM) च्या पार्श्वभूमीवर या अडकलेल्या भारतीयांना थेट विमान सेवेद्वारे तिथून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी येथील भारतीय दूतावास ऑपरेशन गंगा फ्लाइट्स अंतर्गत युक्रेनमधून आणि त्यांच्या संबंधित देशांमधून भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची व्यवस्था करत आहेत.

28 फेब्रुवारी 2022 पर्यंत (12:00 वाजेपर्यंत), युक्रेनमधून भारतीयांना घेऊन येणारी 5 विमाने भारतात (एक मुंबईत आणि चार दिल्लीत) आली आहेत, ज्यात एकूण 1156 प्रवासी असून आतापर्यंत एकाही प्रवाशाला अलगीकरणात ठेवलेले नाही.


* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801819) Visitor Counter : 243