पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधानांनी रेडिओच्या  श्रोत्यांना तसेच हे उत्कृष्ट माध्यम समृद्ध करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या

Posted On: 13 FEB 2022 3:05PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनानिमित्त  रेडिओच्या सर्व  श्रोत्यांना आणि आपल्या  प्रतिभेने तसेच सर्जनशीलतेने हे उत्कृष्ट माध्यम अधिक समृद्ध करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटच्या संदेशात  पंतप्रधान म्हणाले;

"रेडिओच्या सर्व श्रोत्यांना आणि या उत्कृष्ट माध्यमाला आपल्या प्रतिभेने आणि  सर्जनशीलतेने समृद्ध करणाऱ्या सर्वाना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा. घरी असो, प्रवासादरम्यान असो आणि अन्यथा इतर कुठलेही ठिकाण असोरेडिओ हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे.लोकांशी जोडले जाण्याचे हे एक अद्भुत माध्यम आहे."

रेडिओ हे सकारात्मकता सामायिक करण्याचे तसेच इतरांच्या जीवनात दर्जात्मक बदल घडवून आणण्यात आघाडीवर असलेल्यांना ओळख मिळवून देण्याचे  एक उत्तम माध्यम असू शकते याचा मी "#MannKiBaat मुळे वारंवार प्रत्यय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचें मी आभार व्यक्त करतो.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798073) Visitor Counter : 236