पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केनियाचे माजी पंतप्रधान महामहीम रायला अमोलो ओडिंगा यांच्यात बैठक
Posted On:
13 FEB 2022 3:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या खाजगी भेटीवर भारतात आलेले केनियाचे माजी पंतप्रधान महामहीम रायला अमोलो ओडिंगा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध आहेत.
सुमारे साडेतीन वर्षांनंतर ओडिंगा यांना भेटू शकल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 2008 पासून भारत आणि केनिया या दोन्ही देशांमध्ये ओडिंगा यांच्याशी अनेकदा झालेल्या भेटीची तसेच 2009 आणि 2012 मध्ये व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा केली. भारत-केनिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी ओडिंगा यांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छाही दिल्या.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798066)
Visitor Counter : 205
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam