पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी खासदार सी जंगा रेड्डी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 05 FEB 2022 12:07PM by PIB Mumbai

 

माजी खासदार सी जंगा रेड्डी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"श्री सी जंगा रेड्डी गारू यांनी आपले जीवन जनसेवेसाठी वाहून घेतले होते. जनसंघ आणि भाजपला यशाच्या नव्या शिखरावर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांचे योगदान अमूल्य  होते. अनेक लोकांच्या हृदयात आणि मनात स्थान त्यांचे स्थान राहिले.  त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणाही दिली. त्यांच्या निधनाने दु:ख झाले.

श्री सी जंगा रेड्डी गारू हे पक्षाच्या वाटचालीच्या अत्यंत महत्त्वाच्या  टप्प्यावर भाजपासाठी प्रभावी आवाज होते. त्यांच्या मुलाशी बोलून शोकभावना  व्यक्त केल्या. ओम शांती."

 

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1795758) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam