अर्थ मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        नारी शक्ती, विकासाची अग्रदूत-‘अमृत काल’ दरम्यान महिलांचा विकास
                    
                    
                        
दोन लाख अंगणवाड्यांत श्रेणीसुधारणा करुन त्यांचे रुपांतर नवीन पिढीसाठी ‘सक्षम अंगणवाडी’मधे करणार 
                    
                
                
                    Posted On:
                01 FEB 2022 3:26PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
'भारताच्या @100, येत्या  25 वर्षांच्या अमृत काळात देशाच्या उज्ज्वल भविष्य घडविण्यात नारी शक्ती अग्रेसर ठरली असून महिलांची  विकासाचे अग्रदूत  अशीओळख झाली आहे, असे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अधोरेखित केले.माननीय पंतप्रधानांनी देखीलआपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारतासाठी @100 ही  संकल्पना मांडली होती.
नारी शक्तीचे महत्त्व ओळखून सरकारने महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या योजनांमध्ये व्यापक सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकांना एकात्मिक लाभ देण्यासाठी मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण  2.0. या तीन योजनांचा  नुकताच आरंभ करण्यात आला आहे.

सक्षम अंगणवाड्या या नव्या युगातील अंगणवाड्या आहेत ज्यात उत्तम पायाभूत सुविधा आणि दृकश्राव्य साधने आहेत, त्या स्वच्छ ऊर्जेने  समर्थित केल्या आहेत आणि लहान  बालकांच्या विकासासाठी सुधारीत वातावरण त्यात उपलब्ध आहे.  या योजने अंतर्गत दोन लाख अंगणवाड्या अत्याधुनिक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज  केली. 
 
 
 
 
M.Iyengar/S.Patgaonkar/P.Malandkar
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1794251)
                Visitor Counter : 433
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam