पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 FEB 2022 9:35AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 "भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

 अत्यंत सामरिक महत्त्व असलेले,आपले तटरक्षक दल हा कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्यांचा  एक उत्कृष्ट समूह आहे, जे आपली किनारपट्टी  सुरक्षित ठेवण्यासाठी अविरतपणे झटतात, तसेच  मानवतेच्या कल्याणासाठी देखील  आघाडीवर असतात.”

***

SushmaK/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794120) Visitor Counter : 163