गृह मंत्रालय

2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात आलेले शौर्य पदके/सेवा पदक पुरस्कार

Posted On: 25 JAN 2022 10:50AM by PIB Mumbai

प्रजासत्ताक दिन-2022 निमित्त एकूण 939 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील पोलीसांना एकूण 51 पदके प्रदान करण्यात आली  तपशील खालीलप्रमाणे आहे:

शौर्य पदके

पदकाचेनाव

पदकांचीसंख्या

पोलीसशौर्यपदक(पीएमजी)

189

 

 

 

 

 

शौर्य पदके 

पदकाचेनाव

पदकांचीसंख्य

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम)

 88

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम)

662

 

 

 

189 शौर्य पुरस्कारांपैकीसर्वाधिक 134 पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल तिथल्या पोलिसांना पुरस्कृत करण्यात आले.अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित भागातील  47 पोलीस आणि ईशान्य प्रदेशात 01 पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत केले आहे.  शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये 115 जवान जम्मू-काश्मीर पोलिस, 30 सीआरपीएफ, 03 आयटीबीपी, 02 बीएसएफ, 03 एसएसबी, 10 छत्तीसगड पोलिस, 09 ओडिशा पोलिस आणि 07 महाराष्ट्र पोलिस आणि उर्वरित राज्य तसेच केन्द्र शासित प्रदेशातील आहेत.  

 

पोलिस शौर्य पदक विजेत्यांमधे महाराष्ट्रातील पुढील पोलिसांचा समावेश आहे 

गोपाल मणिराम उसेंडी, एपीएस आयपीएमजी 

महेंद्र गानू कुलेती, एनपीसी पीएमजी

संजय गणपती बकमवार, पीसी पीएमजी

भरत चिंतामण नागरे, पीएसआय पीएमजी

दिवाकर केसरी नरोटे, एनपीसी पीएमजी

निलेश्वर देवाजी पाडा, एनपीसी पीएमजी

संतोष विजय पोटावी, पीसी पीएमजी

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्यांमधे महाराष्ट्रातील पुढील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे 

श्री विनय महादेवराव करगावकरअतिरिक्त पोलिसमहासंचालकमुंबई,

श्री प्रल्हाद निवृत्ती खाडेकमांडंटएस.आर.पी.एफ.जीआर.व्हीआयधुळे,

श्री चंद्रकांत रामभाऊ गुंडगेपोलीस निरीक्षकपी.टी.सीदौंडपुणे

श्री अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झापोलीस उपनिरीक्षकनांदेड

 

पुरस्कार विजेत्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

Sl No.

Subject

Number of Persons

List

1.

पोलीसशौर्यपदक(पीएमजी)

189

यादी-I

2.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम)

88

यादी-II

3.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम)

662

यादी-III

4.

पदकप्राप्तकरणाऱ्यापोलिसांचीराज्यवारदलनिहाययादी

यादीप्रमाणे

यादी-IV

 

 

 

यादी-पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी-II पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी-III पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी-IV पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

Jaydevi PS/ Vinayak

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1792458) Visitor Counter : 647