पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ थीरु आर. नागास्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2022 8:59PM by PIB Mumbai
सुप्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ थीरु आर. नागास्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तमिळनाडूची विविधांगी कलात्मक संस्कृती लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“तमिळनाडूची विविधांगी कलात्मक संस्कृती लोकप्रिय करण्यात थीरु आर. नागास्वामी यांनी दिलेले योगदान येणाऱ्या पिढ्या कधीही विसरणार नाहीत. इतिहास, पुराभिलेख शास्त्र आणि पुरातत्व शास्त्र या बाबत त्यांचा अभ्यास उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायक आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ॐ शांति.” असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1792042)
आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam