पंतप्रधान कार्यालय
सैन्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय लष्करातील जवानांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
15 JAN 2022 9:13AM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 15 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दिनानिमित्त भारतीय लष्करातील जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे;
"सैन्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, विशेषतः आपल्या शूर सैनिकांना, आदरणीय निवृत्त सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना. भारतीय लष्कर आपल्या शौर्य आणि आपल्या उच्च कार्यमूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारतीय लष्कराचे अमूल्य योगदान शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.
भारतीय लष्कराचे जवान प्रतिकूल क्षेत्रात सेवा देतात आणि नैसर्गिक आपत्तींसह मानवतावादी कार्यात नागरिकांना मदत करण्यात आघाडीवर असतात. परदेशातील शांती अभियानामध्ये लष्कराच्या उत्कृष्ट योगदानाचा भारताला अभिमान आहे."
***
MC/Sonali/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790108)
अभ्यागत कक्ष : 351
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam