पंतप्रधान कार्यालय
पात्र असलेल्या सर्वांना खबरदारीची लसमात्रा घेण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2022 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2022
भारतात कोविड प्रतिबंधासाठी खबरदारीची लसमात्रा देण्यास सुरुवात झाली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पात्र असलेल्या सर्वांना ही खबरदारीची मात्रा घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी आज ही मात्रा घेतली त्या सर्वांची प्रशंसा देखील पंतप्रधानांनी केली आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारताने आज खबरदारीची मात्रा देण्यास प्रारंभ केला. ज्यांनी आज ही मात्रा घेतली त्यांचे अभिनंदन. कोविड-19 विरोधात लसीकरण हे सर्वात प्रभावी साधन आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे."
* * *
S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1789035)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam