पंतप्रधान कार्यालय

कोविड लसीकरण मोहिमेत150 कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले देशबांधवांचे अभिनंदन

Posted On: 07 JAN 2022 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022

 

कोविड लसीकरण मोहिमेत, लसींच्या 150 कोटी मात्रा देण्याचा महत्वाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांचे अभिनंदन केले आहे. देशाची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी, जे अहोरात्र परिश्रम करत आहेत, अशा सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले आहेत.   

यासंदर्भात केलेल्या ट्वीट्स द्वारे पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"देशाच्या लसीकरण मोहिमेतील अत्यंत महत्वाचा दिवस! 150 कोटी  लसींचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व देशबांधवांचे अभिनंदन ! आपल्या लसीकरण मोहिमेमुळे, अनेक जीव वाचले आहेत. त्याचवेळी, आपल्याला अजून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करायचे आहे, हे ही लक्षात घ्यावे.

ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जे अहोरात्र परिश्रम करत आहेत अशा सर्व लोकांचा भारत ऋणी आहे. आम्ही आपल्या डॉक्टरांचे, वैज्ञानिकांचे, संशोधकांचे आणि लोकांना लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. माझी सर्व पात्र लोकांना विनंती आहे, की त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. आपण सगळे एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध लढा देऊया. "

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788470) Visitor Counter : 403