आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 : गैरसमज आणि तथ्ये
15-18 वयोगटासाठी कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्याचा दावा काही माध्यमांमधून केला जात असून तो दिशाभूल करणारा आहे
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2022 2:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022
15-18 वयोगटासाठी कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली नसतानाही काही माध्यमांमधून या लसीला मंजुरी दिल्याचा दावा केला जात असून तो दिशाभूल करणारा आहे. हे वृत्त अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे आणि सत्याची शहानिशा न करता केलेले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्याचा कुठेही उल्लेख नाही. 27 डिसेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वांमध्ये पृष्ठ 4 वरील उप-शीर्षक (e) वर “15-18 वर्षे वयोगटातील नवीन लाभार्थी” या शीर्षकाखाली, म्हटले आहे की “या लाभार्थ्यांसाठी, केवळ कोवॅक्सिन लसीकरणाचा पर्याय उपलब्ध असेल. कोवॅक्सिन ही 15-18 वयोगटासाठी मंजुरी मिळालेली एकमेव लस आहे".
24 डिसेंबर 2021 रोजी 12-18 वर्षे वयोगटातील कोवॅक्सिन लसीसाठी CDSCO या राष्ट्रीय नियामकाने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर, 15-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आणि इतर सह्व्याधी असलेल्यांसाठी खबरदारी म्हणून मात्रा देण्याबाबत 27 डिसेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ती उपलब्ध आहेत आणि
ttps://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesforCOVID19VaccinationofChildrenbetween15to18yearsandPrecautionDosetoHCWsFLWs&60populationwithcomorbidities.pdf यावर पाहता येतील
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1788289)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada