पंतप्रधान कार्यालय
त्रिपुरातील 1.47 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 14 नोव्हेंबरला प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गत पहिला हप्ता पंतप्रधान करणार हस्तांतरित
प्रविष्टि तिथि:
13 NOV 2021 6:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 नोव्हेंबर 2021 ला दुपारी 1 वाजता दूर दृश्य प्रणाली द्वारे त्रिपुरातील 1.47 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण (पीएमएवाय- जी) चा पहिला हप्ता हस्तांतरित करणार आहेत.
यावेळी 700 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
पंतप्रधानांनी विशेष लक्ष घातल्यामुळे त्रिपुराची भिन्न भौगोलिक-हवामान स्थिती लक्षात घेऊन, विशेष करून या राज्यासाठी ' कच्च्या' घराची संकल्पना बदलण्यात आली आहे, जेणेकरून इतक्या मोठ्या संख्येने 'कच्च्या' घरांमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी सहाय्य मिळू शकले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1771488)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam