पंतप्रधान कार्यालय
युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची नेपाळच्या पंतप्रधानांसोबत भेट
Posted On:
02 NOV 2021 9:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने नेपाळचे पंतप्रधान श्री शेर बहादूर देउबा यांची भेट घेतली.
2. उभय नेत्यांनी कोविड-19 महामारीविरोधात सुरु असलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात द्विपक्षीय सहकार्य आणखी दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा केली.महामारीच्या काळात विशेषत: भारताकडून नेपाळला लस, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणे तसेच सीमेपलीकडे वस्तूंचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करणे यासह भारत आणि नेपाळमधील उत्कृष्ट सहकार्याची दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली. महामारी पश्चात पूर्वस्थितीत येण्यासाठी सहकार्य करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
3. या वर्षी जुलैमध्ये श्री देउबा यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यावर दूरध्वनीवरून झालेल्या संवादानंतर पंतप्रधान मोदी आणि देउबा यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769038)
Visitor Counter : 325
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam