पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या इटली दौऱ्याबाबत परराष्ट्र सचिवांच्या विशेष निवेदनाचा वृत्तांत

Posted On: 30 OCT 2021 2:27PM by PIB Mumbai

अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ते: स्त्री आणि पुरुष गण , तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत . रात्री उशिरा  आमच्याबरोबर सहभागी  झालेल्यचे  आणि भारतातून  थेट व्हिडिओ प्रसारणाद्वारे सहभागी  झालेल्यांना  खूप खूप धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोममध्ये आहेत, आणि आज त्यांच्या दौऱ्याचा हा पहिला दिवस आहे. इथे काय घडत आहे  आणि आम्ही काय नियोजन केले आहे  त्याबद्दल आपल्याला     सांगण्यासाठी, भारताचे परराष्ट्र सचिव  हर्षवर्धन श्रृंगला आपल्याबरोबर आहेत , जे आपल्याला सविस्तर माहिती देतील.  सर, आणखी इतर काही न बोलता मी माईक तुमच्या स्वाधीन करतो.

हर्षवर्धन श्रृंगला, परराष्ट्र सचिव: नमस्कार आणि शुभ संध्याकाळ   आणि आपल्या प्रसारमाध्यमांतील  मित्रांना पुन्हा भेटताना आनंद होत आहे.  तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान आज सकाळी रोम इथे  पोहोचले आहेत. 16व्या जी 20 शिखर परिषदेला उपस्थित राहणे हा त्यांच्या भेटीचा  मुख्य उद्देश आहे. मात्र ते या निमित्ताने विविध देशांच्या राष्ट्र         प्रमुखांबरोबर  द्विपक्षीय बैठका देखील घेत  आहेत. इथे आगमन   झाल्यानंतर पंतप्रधानांनी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष महामहिम चार्ल्स मिशेल आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष, महामहिम उर्सुला वॉन  डेर लेयन  यांची भेट घेतली. तुम्हाला या दौऱ्याची पार्श्वभूमी माहीतच आहे , पंतप्रधान उद्या जी 20 नेत्यांबरोबर  जागतिक , आर्थिक  आणि आरोग्य सुधारणा ,  शाश्वत विकास आणि हवामान बदल या    विविध मुद्द्यांवरील  चर्चेत सहभागी होणार आहेत.

आपले जी 20 शेर्पा, आपल्या  वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी    याबाबत तुम्हाला थोडी माहिती दिल्याचे  मला समजले. त्यामुळे  मी पंतप्रधानांच्या आज झालेल्या कार्यक्रमांवर  बोलतो.  युरोपियन आयोग  आणि परिषदेच्या अध्यक्षांसोबतच्या बैठकीबद्दल तसेच इटलीचे    पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीबद्दल माहिती देतो. त्यांच्याशी झालेल्या चर्चेचे मुख्य मुद्दे, जर तुम्ही    पाहिले तर, ते प्रामुख्याने जी 20 शिखर परिषदेशी संबंधित आहेत   तसेच आरोग्य,कोविड संकटातून सावरणे आणि जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. हवामान     बदलाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच  अफगाणिस्तान, हिंद-प्रशांत क्षेत्रातील परिस्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक हिताच्या    मुद्द्यांवरही  चर्चा झाली.

ईयू,  युरोपियन महासंघाच्या च्या बैठकीबद्दल बोलायचे तर, मला वाटते की या वर्षी मे महिन्यात ईयू  प्लस 27 च्या स्वरूपात भारत-युरोपीय संघाच्या नेत्यांची बैठक झाली आणि 15वी भारत- युरोपीय  संघ  शिखर परिषद जुलै 2020 मध्ये झाली. युरोपीयन  महासंघ हा भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या भागीदारांपैकी एक आहे आणि आजच्या बैठकीत नेत्यांनी उभय देशांमधील सहकार्याचा आढावा घेतला     ज्यामध्ये राजकीय आणि सुरक्षा संबंध, व्यापार आणि गुंतवणूक संबंध, तसेच शेवटच्या  भारत -युरोपीय संघाच्या  शिखर परिषदेत मान्यता दिलेल्या 'रोडमॅप 2025'चा समावेश आहे.  मी नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी हवामान बदल, कोविड-19 महामारी आणि परस्पर हिताच्या समकालीन जागतिक आणि   प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली.

पंतप्रधानांनी हवामान बदल, अफगाणिस्तान, हिंद-प्रशांत क्षेत्र  या विषयांवर भारताचा  दृष्टिकोन अधोरेखित केला.    युरोपियन संघाच्या  नेत्यांनी तसेच इटलीच्या  पंतप्रधानांनी        लसीकरणातील भारताच्या  उत्कृष्ट प्रगतीबद्दल ,दोन्ही ,  लसींच्या  एकूण मात्रांच्या बाबतीत आणि पहिल्या मात्रांच्या संदर्भात लोकांच्या  टक्केवारीच्या बाबतीत पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यानंतर  दुपारी, पंतप्रधानांनी पियाझा गांधी येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, यावेळी  मोठ्या संख्येने भारतीय   समुदायाचे सदस्य उपस्थित होते , जे पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी तेथे आले होते, त्यांनी उत्साहात यात भाग घेतला.

आता  आपण बोलत आहोत, तेव्हा पंतप्रधान देखील इटलीमधील   भारतीय समुदायाचे सदस्य, इटालियन हिंदू युनियनचे  प्रतिनिधीं,   विविध संघटनांतील भारतीय मित्रमंडळी ,इस्कॉनचे प्रतिनिधी ,  शीख समुदाय आणि जागतिक युद्धात इटलीमध्ये लढलेल्या भारतीय     सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहभागी संस्थाच्या प्रतिनिधींना स्वतंत्रपणे भेटत आहेत, बैठकी दरम्यान ते अनेक विचारवंत आणि संस्कृत    अभ्यासकांशी संवाद साधत आहेत. भारत आणि इटली यांच्यातील   संबंध दृढ करण्यासाठी समुदायाच्या सदस्यांनी बजावलेल्या भूमिकेचे  पंतप्रधानांनी कौतुक केले .

पलाझो चिगी या इटलीच्या पंतप्रधानांचे अधिकृत कार्यालय आणि   निवासस्थानी  इटलीच्या पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबद्दल बोलायचे  तर  ही त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट होती. पंतप्रधान आणि द्राघी     यांच्यात अनेक वेळा दूरध्वनीवरून संभाषण झाले आहे , अलिकडेच 27 ऑगस्ट रोजी त्यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा केली होती आणि तुम्हाला माहिती आहेच की, पंतप्रधान द्राघी यांनी त्यांना    अफगाणिस्तानवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते ज्याला पंतप्रधान उपस्थित राहिले होते आणि त्या विषयावर त्यांची  चर्चाही झाली. मला वाटते की त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या भारत-इटली व्हर्च्युअल शिखर परिषदेनंतरच्या प्रगतीचा आणि सहकार्याच्या  इतर क्षेत्रांचा आढावा घेतला.

नवीकरणीय आणि स्वच्छ ऊर्जेतील द्विपक्षीय सहकार्याला पुन्हा    चालना देण्यासाठी, भारत आणि इटलीने ऊर्जा संक्रमणावर धोरणात्मक भागीदारीची घोषणा करणारे संयुक्त निवेदन जारी केले आणि मोठे ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवण उपाय , गॅस       वाहतूक, एकात्मिक कचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती ,  ग्रीन हायड्रोजनचा विकास आणि उपयोजन आणि जैवइंधनाला प्रोत्साहनयासारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या संधींचा  शोध घेण्याबाबत  सहमती दर्शवली.  बैठकीदरम्यान भारत आणि इटलीने  वस्त्रोद्योग  सहकार्याच्या एका करारावर स्वाक्षरी केली.  दुहेरी गुंतवणुकीवर खूप चांगली चर्चा झाली, विशेषत: स्वच्छ ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम    क्षेत्रात,  इटलीकडे बरेच कौशल्य आहे आणि मला वाटते की हे सगळे पुढे कसे नेता येईल याबाबतही त्यांनी उत्सुकता  दर्शवली.

तुम्ही बघू शकता, रोममधला पहिला दिवस खूपच व्यस्त गेला.  उद्या, पंतप्रधान व्हॅटिकन सिटी येथे परम पूज्य  पोप फ्रान्सिस यांची    भेट घेतील  आणि त्यानंतर, ते जी 20 सत्रांना उपस्थित राहतील,  तिथे  ते आणखी द्विपक्षीय बैठका देखील घेतील आणि आम्ही     तुम्हाला याबाबत माहिती देत राहू.

अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ते: सर, तुमचे खूप खूप आभार. आपण  काही प्रश्न घेऊ. खरोखरच  वेळेची मर्यादा आहे , कारण मला    वाटते की परराष्ट्र सचिवांना दुसऱ्या  कार्यक्रमासाठी  जावे लागेल.  आता  बोलू या  सिद्धांत यांच्याशी.

सिद्धांत: नमस्कार , मी WION चा प्रतिनिधी सिद्धांत आहे. माझा प्रश्न असा आहे की, आज सकाळी युरोपियन  संघटनेच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान , लस प्रमाणपत्रांच्या परस्पर मान्यतेवर भर देताना भारतातील लसी, भारतीय लस       प्रमाणपत्रांच्या मान्यतेवर किती चर्चा झाली? तसेच, जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा भारताच्या बाजूने कशी भूमिका मांडण्यात आली ,  त्याबद्दल देखील तुम्ही सांगा.

 

मनीष चंद: सर, मनीष चंद, इंडिया राईटस नेटवर्कमधून . माझा प्रश्न असा आहे की मागच्या शिखर परिषदेत  भारत आणि इटली आफ्रिकेसारख्या तिसऱ्या  देशांमध्ये एकत्र काम  करतील असा एक प्रस्ताव होता आणि अर्थातच आता हिंद-प्रशांत हा आघाडीचा मुद्दा आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र  आणि तिसऱ्या देशांमध्ये सहकार्यासाठी काही ठोस     योजनांवर चर्चा झाली का?

वक्ता 1: ब्लूमबर्ग न्यूज. मंत्री महोदय, G20 सदस्यांना कोविड - 19 लसिला परस्पर सामंजस्याने मान्यता देउन आंतरराष्ट्रीय प्रवास सुरळीत करण्यासाठी भारता तर्फे नक्की काय प्रस्ताव दिला जाणार आहे ? आपण पंतप्रधान आणि पोप  यांच्या उद्याच्या भेटीच्या अजेंडयाबद्दल विस्ताराने सांगाल का? मला असं म्हणायचं आहे, ते नक्की कुठल्या विषयावर चर्चा करणार आहेत, विशेषतः भारतातील ख्रिस्ती की आणखी काही? दुसरी गोष्ट अशी......

 

वक्ता 2: आणि, आपण,  COP26  शिखर परिषदेपूर्वी आपल्या निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबद्दल काय अपेक्षा आहेत? विशेषतः भारताच्या अमेरिकेशी सहकार्या विषयी, मला एक लक्षात आलं आहे अमेरिकेने भारताला निधी, तंत्रज्ञान देण्याचे काबुल केले आहे आणि त्याबदल्यात हवामान बदल यावर अमेरिकेला भारताचे सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद

हर्ष वर्धन श्रींगला, विदेश सचिव: आपण लसीकरण प्रमाणपत्रां पासुन सुरवात करूया, कारण सिद्धांत आणि ब्लूमबर्ग, दोघांनीही मला याविषयी प्रश्न विचारले आहेत. मला असं वाटतं की, लसीकरण प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विशेषतः युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. आणि मला असं वाटतं जग आता कोविड महामारीतून सावरत असल्याने सुलभ पोहोच, आंतरराष्ट्रीय प्रवास सामान्य करण्याविषयी नक्कीच चर्चा झाली असेल. कोविड लसी यांना परस्पर सामंजस्याने मान्यता देण्याविषयी बोलणी झाली. मला असं वाटतं, एक सर्वसामान्य भावना अशी आहे की ही एक गोष्ट, मी असं म्हणेन, करण्यासारखी आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होईल. याविषयीचा तपशील द्विपक्षीय चर्चेत ठरवला जाईल. मला असं वाटतं, युरोपियन युनियन, युरोपिअन परिषदच यावर सामान्य मार्गदर्शक सूचना देऊ शकतात. मला असं वाटतं युरोपिअन युनियनमधल्या काही देशांनी आधीच आमच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला आहे, या बाबतीत आम्ही थोडे पुढे देखील गेलो आहोत. आणि G20 विषयी देखील एक प्रश्न होता. G20 मध्ये देखील आम्ही परस्पर संमतीने लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. मात्र, आता आपण बोलत असताना, अंतिम प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. म्हणून मला असं वाटतं, बहुतांश देशांना सुलभ आणि सोप्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या प्रस्तावामुळे आनंद झाला आहे. यातून काय विस्तृत माहिती बाहेर येते हे बघावे लागेल मात्र या प्रकरणी वस्तुस्थिती अशी आहे, आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ आणि सोपा करण्यासठी यावर सामायिक प्रयत्न केले पाहिजे असं अनेक देशांना वाटतं. आणि पंतप्रधानांनी मांडलेल्या मुद्द्याची योग्य दखल घेण्यात आली आहे. 

 

मनीषचा प्रश्न होता गरीब देशांत काम करण्याविषयी, तुम्ही आफ्रिका आणि आसियान देशांचा उल्लेख केला, आणि इतर. मला वाटतं, पुन्हा, युरोपियन युनियनच्या स्तरावर, या विषयी चर्चा झाली. हिंद प्रशांत क्षेत्राविषयी युरोपियन युनियनने तयार केलेल्या रणनीतीला मान्यता देण्यात आली आहे, राष्ट्राध्याक्ष्या उर्सुला वोन डी लेयेन आणि राष्ट्राध्यक्ष चार्ल्स मिशेल दोघेही हिंद प्रशांत क्षेत्राला असलेले सर्वसाधारण आणि खास करून भारता सोबत काम करण्याचे महत्व  याविषयी बोलले. आणि मला असं वाटतं या विषयावर सखोल चर्चा करण्याची गरज नेत्यांनी ओळखली आहे. पंतप्रधानांनी त्यांना उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात पाठविण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेणेकरून आपण नोंदी आणि अनुभवाचे आदानप्रदान करून, आणि कदाचित एक कृती दल स्थापन करता येईल, जे हिंद प्रशांत क्षेत्रात युरोपियन युनियनचे सहकार्य पुढे नेईल. आपल्याला माहीतच आहे युरोपियन युनियन मधल्या फ्रांस, जर्मनी, नेदरलँड्स सारख्या देशांनी हिंद प्रशांत क्षेत्रासाठी आधीच रणनीती तयार केली असून, हिंद प्रशांत क्षेत्रासाठी धोरण बनविले आहे. समविचारी देशांनी हिंद प्रशांत क्षेत्रात सहकार्य करण्याचा विचार जोर धरत आहे, आणि मला असं वाटतं, याला,समर्थन वाढत आहे आणि पंतप्रधानांची आज नेत्यांशी झालेल्या चर्चेतून या संदर्भात वेगाने हालचाली करण्याचे संकेत देण्यात आले

 

उद्याच्या हिज होलीनेस पोप यांच्याशी होणाऱ्या भेटी संदर्भात,  मला माहीत आहे, पंतप्रधानांनी वेगळा विचार केला असेल आणि निश्चित काळानंतर शिष्टमंडळ स्तरावर त्याचा पाठपुरावा केला जाईल. व्हॅटिकनने अजून अजेंडा ठरवला नाही. मला असं वाटतं, हिज होलीनेस यांच्याशी चर्चा करताना कुठलाही अजेंडा नसण्याची परंपरा आहे. आणि आपण त्याचा सन्मान केला पाहिजे, असं मला वाटतं. आणि संपूर्ण जग त्याला उचित मान देतं. मला खात्री आहे, त्या भेटीत, जागतिक परीपेक्ष, आपल्या सर्वांसाठी महत्वाचे असलेले विषय, कोविड -19, आरोग्याच्या समस्या, एकमेकांशी सहकार्य करून एकत्र काम करणे, जागतिक शांतता टिकवणे, अनेक विषयांवर चर्चा होईल, आणि मला असं वाटतं, हा चर्चेचा सर्वसाधारण सूर असेल. 

आता, आपण निधीबद्दल आणि हवामान बदल परिषद  26  (COP 26) मधील तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मुद्द्याबद्दल सांगितल्याप्रमाणे,मला वाटते की, पंतप्रधानांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत,त्याला आपण  मोठ्या वचनबद्धतेशी संबंधित  विकसनशील देशांच्या चिंता म्हणूयात.जरी संबंधित देश पॅरिस येथे पॅरिस करारामध्ये निर्धारित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी  प्रयत्नशील असताना, मला वाटते , आम्ही आधीपासूनच  उद्दिष्ट बदलताना बघत आहोत, आणखी उद्दिष्ट निश्चित केली जात आहेत.पंतप्रधानांनी आपले स्वतःचे उदाहरण दिले आणि सांगितले की, भारत प्रत्यक्षात पॅरिसमध्ये स्वतःचे राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान  साध्य करण्याच्या अगदी जवळच केवळ पोहोचलेला  नाही तर कदाचित त्यापैकी बहुतेक उद्दिष्ट भारताने साध्य केली आहेत.

मात्र  त्याच वेळी विकसनशील देशांना त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण  कशा प्रकारे पाठबळ देत आहोत  या संदर्भात विशेषतः, हवामानसंदर्भातील  वित्तपुरवठा, हरित वित्तपुरवठा आणि हरित तंत्रज्ञानाच्या संदर्भात, अधिक उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे. याबाबतीत  केवळ वचनबद्धतेपेक्षा अधिक  ठोस  पाठबळ द्यायला हवे .मी म्हणेन, अशी आश्वासने ज्यामुळे विकसनशील देश वास्तविक सवलतींच्या  प्रवाहात येतील आणि विकसनशील देशांना मदत करण्यासाठी आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण त्यांना पाठिंबा देऊ शकतो  मला वाटते की, हवामान बदलाच्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.आणि भारताने हाती घेतलेले  समायोजन , हवामान बदलांवर  मात  करण्यासाठी उचललेल्या पावलांवर बरीच चर्चा झाली.आणि मला वाटतं, या चर्चांमध्ये  कशाप्रकारे  विचारविनिमय होतो  हे आपल्याला पाहत राहावं लागेल.पण मला वाटते,पंतप्रधानांनी अगदी स्पष्टपणे हा मुद्दा मांडला,अनेक देश हे प्रत्यक्ष कृती  करत नसल्यामुळे अजून काहीतरी करावे लागेल,उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्न करण्यासोबतच आपल्याला इतर बाबींवर  देखील काम करण्याची  आवश्यकता आहे,उदाहरणार्थ जीवनशैलीतील बदल. भारत नेहमीच निसर्गाशी सुसंगत राहिला आहे, दरडोई बाबतीत पाहिले तर  आपण सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये आहोत.मात्र त्याच वेळी,आमचा असा विश्वास आहे की,  उत्सर्जन  कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण जागतिक स्तरावर शाश्वत जीवनशैली कशी जगू शकतो हे पाहणे.  म्हणजे हवामान बदलाच्या दृष्टीने तापमानाची मर्यादा आपोआप कमी होईल.त्यामुळे हवामान बदलातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्वअट म्हणून जीवनशैलीत बदल करा.

दहशतवाद, मला असे वाटते की, अफगाणिस्तानसंदर्भात  झालेल्या चर्चेत हा मुद्दा विशेषत: समोर  आला आहे.  उभय  नेत्यांनी .हवामान बदल आणि अफगाणिस्तान या दोन विषयांवर बराच वेळ चर्चा केली आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर मला वाटते की, अफगाणिस्तानची परिस्थिती पूर्णपणे वेगळ्या रीतीने  पाहिली जाऊ शकत नाही, अफगाणिस्तानात .सुशासन  प्रदान करण्यातील अपयश आणि असमर्थता,परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम नसणे, हे जसे आहे त्याप्रमाणे  हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे आणि   अफगाणिस्तानमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही धोक्याचा किंवा धमक्यांचा सामना करताना आंतरराष्ट्रीय समुदायाने अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे, मला वाटते की,हे  पंतप्रधानांनी अगदी स्पष्टपणे सांगितले. अफगाणिस्तानातील समस्यांची मूळ कारणे म्हणजे मूलतत्त्ववाद, दहशतवाद, कट्टरतावाद  आणि त्यामुळे होणारे  परिणाम याचे अत्यंत  काळजीपूर्वक परीक्षण करण्याची गरज आहे. म्हणून मला वाटते की, यासंदर्भात  एक तीव्र भावना होती,जी युरोपियन युनियन आणि इटलीमधील आमच्या भागीदारांना पूर्णपणे समजली. दोघांनीही यावर विचारविनिमय केला  आणि त्यांना वाटले की या मुद्द्यावर  लक्ष  घालण्याची गरज आहे. अर्थात, मानवतावादी परिस्थितीवरही भर दिला जातो हे देखील खरे आहे आणि अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीच्या  परिणामी,  अफगाणिस्तानच्या लोकांना त्रास होणार नाही हे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, एकत्रित पाठिंबा मिळविण्यासाठी पंतप्रधान द्राघी यांनी विशेषतः अफगाणिस्तानवरील  G20 शिखर परिषदेदरम्यान केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला.त्या देशातील राज्यकर्ते आणि जनता यांच्यात फरक असून जनतेला मदत करावी, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  अफगाणिस्तानला आम्ही मानवतावादी सहाय्य देऊ केले होते,  ही महत्वपूर्ण मदत  आम्हाला  अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि अफगाणिस्तानला ही मानवतावादी मदत थेट , विनाअडथळा मिळावी हे  सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

द्विपक्षीय संबंधांकडे येताना मला फक्त हे नमूद करायचे आहे की, अलीकडच्या वर्षांत इटलीबरोबरच्या संबंधात लक्षणीय सुधारणा  झाली आहे,पंतप्रधान म्हणाले की द्विपक्षीय संबंधांमध्ये विशेषत: गुंतवणूक, व्यापार आणि लोकांशी परस्पर  संबंध या क्षेत्रांमध्ये उत्सुकता आणि जोश दिसून आला आहे आणि पंतप्रधान द्राघी यांनीही याचे  जोरदार समर्थन केले आणि पंतप्रधानांनी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले.त्यांनी राष्ट्राध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि उर्सुला वॉन डी लेन या दोघांनाही भारत भेटीसाठी आमंत्रित केले.  त्यामुळे एका विशिष्ट अर्थाने, मला वाटते, कोविडमुळे फारच कमी विचारविनिमय झाला आहे.आम्हाला एक नवी सुरुवात करायची आहे, आम्हाला आमच्या राजनैतिक संबंधांना गती द्यायची आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नाच्या संदर्भात तुम्हाला पंतप्रधानांनी दिलेल्या भारतभेटीच्या निमंत्रणाकडे पहावे लागेल.

 

श्री अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ते: धन्यवाद, सर. फक्त आणखी काही प्रश्न. प्रणय.

 

प्रणय उपाध्याय: मी प्रणय उपाध्याय एबीपी न्यूजमधून. जागतिक पुरवठा साखळी विविधीकरण हा एक महत्वपूर्ण मुद्दा राहिला आहे, आणि हा मुद्दा भारतही  मांडत राहिला आहे. युरोपियन युनियन  सोबतच्या बैठकीत, युरोपियन युनियनच्या अध्यक्षांसोबत आणि इटलीसोबतच्या द्विपक्षीय बैठकीतही या विषयावर चर्चा झाली आहे का आणि भारत हा रोडमॅप कोणत्या मार्गाने पुढे नेऊ इच्छितो?

 

 

स्पीकर 2: तुम्ही आम्हाला भारत-इटालियन बैठकीबद्दल, विशेषत: आर्थिक सहकार्याच्या नवीन सीमांबद्दल आणखी काही सांगू शकाल का?

 

 

श्री अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ते: धन्यवाद.

 

 

श्री हर्षवर्धन श्रृंगला, परराष्ट्र सचिव: ठीक आहे. मी आधी या  प्रश्नाचे  पटकन उत्तर देतो. मला वाटते की ,मी म्हटल्याप्रमाणे उभय  पंतप्रधानांना वाटते

 की,व्यापार आणि गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे.इटलीचे पंतप्रधान म्हणाले की, भारतात गुंतवणूक करण्यास, भारतात व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या  इटालियन कंपन्या मोठ्या संख्येने आहेत.वेळेअभावी ते याबद्दल तपशील देऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. भारतीय आणि इटालियन कंपन्यांमधील सहकार्य वाढवण्यासाठी आणि विशेषत: अक्षय्य  ऊर्जा आणि  ई- वाहतुकीचा प्रस्ताव असलेल्या वाहन निर्मितीसारख्या क्षेत्रात इटालियन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी इच्छुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. इटलीमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्या उत्कृष्ट दुचाकी आणि तीन-चाकी इलेक्ट्रिक वाहने बनवतात. त्यामुळे यापैकी अनेकांसोबत काम करण्यासाठी  वाव आहे,  असे मला वाटते.त्यामुळे उभय नेत्यांच्या बैठकीत भारत आणि इटली यांच्यातील व्यापार गुंतवणूक आणि आर्थिक देवाणघेवाण क्षेत्रासंदर्भात बरीच चर्चा झालेली पाहायला मिळाली.

प्रणय जी तुमचा प्रश्न पुरवठा साखळी संदर्भात होता. लवचिक पुरवठा साखळ्यांबद्दल नक्कीच चर्चा झाली. ही चर्चा युरोपियन युनियन  आणि इटालियन पंतप्रधान या दोघांसोबतही  झाली, मात्र आम्ही याबद्दल तपशीलात  जाऊ शकलो नाही ,मात्र यावर अधिक काम व्हावे  आणि दोन्ही बाजूंनी यावर एकत्र काम केले पाहिजे अशी दोन्ही बाजूंची इच्छा आहे आणि आम्ही सुरक्षित पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी भविष्यात या दोन भागीदारांसोबत एकत्र काम करू.हे निश्चित करण्यात आले.

 

श्री अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ता: सर प्रत्येकजण हिंदी बोलत नसल्यामुळे, मी याच्या शेवटच्या भागाचा अनुवाद करेन.  इटलीच्या पंतप्रधानांसोबतच्या संवादात लवचिक पुरवठा साखळीच्या मुद्द्यावर चर्चा झाली की नाही या संदर्भात प्रश्न होता, आमच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले की, हा मुद्दा इतका तपशीलवार चर्चिला  नसला तरी तो मुद्दा मांडण्यात आला. यावर आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, यावर अधिक काम करणे आणि सुरक्षित आणि लवचिक पुरवठा साखळी सुनिश्चित करणे  आवश्यक आहे, हीच भावना होती.

 

 

श्री हर्षवर्धन श्रृंगला, परराष्ट्र सचिव: विशेषत: इंडो पॅसिफिकच्या संदर्भात.

 

श्री अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ता : या सोबतच आम्ही विशेष पत्रकारपरिषदेच्या शेवटाकडे  आलो आहोत. यात  सहभागी  झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सर ,तुमच्या उपस्थितीबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो  आणि आशा आहे की आम्ही तुम्हाला माहिती देत राहू.  कृपया आमच्या समाजमाध्यमांवर तसेच आमच्या संकेतस्थळ वाहिनीवर  संपर्कात रहा. धन्यवाद. नमस्कार.

 

श्री हर्षवर्धन श्रृंगला, परराष्ट्र सचिव: धन्यवाद.

***

JPS/NC/SK/RA/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768068) Visitor Counter : 257