पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

निवडणुकीतल्या विजयाबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 22 SEP 2021 9:54AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतल्या  विजयाबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे  अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"निवडणुकीतल्या  विजयाबद्दल पंतप्रधान @JustinTrudeau तुमचे  अभिनंदन ! भारत-कॅनडा संबंध तसेच जागतिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर आपले  सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी  मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे."

***

Jaydevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1756911) Visitor Counter : 148