पंतप्रधान कार्यालय

पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल सुहास यथिराजचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 05 SEP 2021 9:12AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुहास यथिराज यांचे टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले ;

``सेवा आणि क्रीडा यांचा हा सुरेख संगम आहे! @dmgbnagar सुहास यथिराज यांनी आपल्या अभूतपूर्व क्रीडा कामगिरीमुळे आपल्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी उत्तमोत्तम शुभेच्छा.``

***

MaheshC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752236) Visitor Counter : 171