युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद’ स्पर्धेतील भारताच्या पदक विजेत्यांशी साधला संवाद
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना सर्व सुविधा आणि सर्वोत्तम प्रशिक्षण सरकार सुनिश्चित करेल - अनुराग ठाकूर
या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची दोन रौप्य पदकांसह तीन पदकांची कमाई
Posted On:
25 AUG 2021 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2021
ठळक मुद्दे :
- आपल्यासाठी हा एक मोठा संस्मरणीय क्षण आहे, आम्हाला तुमच्यामध्ये आशेचा किरण दिसतो : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
- श्वसनात येत असलेल्या अडथळ्यावर धैर्याने मात करत भारताच्या अमित खत्रीची पुरुषांच्या 10000 मीटर जलद चालण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी
- लांब उडी प्रकारात शैली सिंहने पटकावले रौप्य पदक
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे 2021 च्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंशी आणि पदक विजेत्यांशी संवाद साधला.
केनियामधील नैरोबी येथील मोई आंतराष्ट्रीय क्रीडा केंद्रात 18 ते 22 ऑगस्ट 2021 दरम्यान आयोजित जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अजिंक्यपद स्पर्धेत भारताने दोन रौप्य पदकांसह तीन पदकांची कमाई केली. आजच्या या संवादादरम्यान लांब उडी प्रशिक्षक रॉबर्ट बॉबी जॉर्ज, अंजू बॉबी जॉर्ज, कमाल अली खान, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक उपस्थित होते.
क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंशी संवाद साधताना पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. "20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा देशाचा अभिमान आहे, आमच्यासाठी हा एक मोठा संस्मरणीय क्षण आहे” असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. म्हणाले. युवा खेळाडू भविष्यातील आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त करत अनुराग ठाकूर म्हणाले की, "आम्हाला तुमच्यामध्ये एक आशेचा किरण दिसतो."
महत्त्वाची गोष्ट अशी की भारताकडे आज बऱ्यापैकी क्रीडा प्रतिभेचे सामर्थ्य आहे, क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांचा विस्तार करण्यात आला आहे आणि भारताच्या युवा खेळाडूंना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा देण्यावर आणि त्यांनी पदक जिंकावीत या दिशेने खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सरकार क्रीडापटूंना सर्व सुविधा आणि सर्वोत्तम प्रशिक्षण सुनिश्चित करेल आणि या दिशेने टॉप्सचे सहकार्य तसेच खेळाडूंनी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षण क्षेत्रात येणाऱ्या माजी खेळाडूंची प्रशंसा करताना या माजी खेळाडूंनी, युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पुढे यावे आणि त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन क्रीडामंत्र्यांनी केले.
अमित खत्रीने 10000 मीटर जलद चालण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद’ स्पर्धेत पुरुषांच्या 10000 मीटर जलद चालण्याच्या स्पर्धेत अमित खत्रीने श्वसनाच्या अडचणींवर धैर्याने मात करत रौप्य पदकाची कमाई केली. अमित खत्री, ज्याने या स्पर्धेत बहुतांश वेळेस आघाडीच्या गटात आपला वेग कायम ठेवला आणि 9000 मीटरच्या बळावर आघाडी घेतली, केनियाच्या हेरिस्टोन वानीयोनी (41:10.84) च्या मागोमाग 42:17.94 मिनिटाला ही स्पर्धा पूर्णकारात अमित खत्री दुसऱ्या स्थानावर राहिला.
कु. शैली सिंगने लांब उडीत रौप्यपदक पटकावले. महिलांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाकडे वाटचाल करताना शैली सिंगने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत 6.59 मीटर लांब उडीची नोंद केली. राष्ट्रीय 20 वर्षांखालील स्पर्धेत विक्रम नोंदवलेल्या शैली सिंग ही लांब उडी खेळातील तीन महिला खेळाडूंपैकी एक आहे जिने 6.35 मीटर लांब उडी मारत आपल्या कामगिरीच्या जोरावर थेट प्रवेश मिळवला.
भारतीय 4x400 मीटर मिश्र रिले संघाने नैरोबी येथे 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद’ स्पर्धेत पहिल्याच दिवशी कांस्यपदक निश्चित केले. बराथ श्रीधर, प्रिया मोहन, सुमी आणि कपिलने प्रशंसनीय वेळेत स्पर्धा पूर्ण करत नायजेरिया (3:19.70) आणि पोलंड (3: 19.80) च्या मागे 3:20.60 ने तिसरे स्थान मिळवले आणि क्वार्टर माईल स्पर्धेत भारताच्या प्रतिभेची झलक दाखवली.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748908)
Visitor Counter : 238
Read this release in:
English
,
Tamil
,
Odia
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam