पंतप्रधान कार्यालय

भारतातील चार स्थळांना रामसर दर्जा मिळाला हे अभिमानास्पद : पंतप्रधान

Posted On: 14 AUG 2021 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021

भारतातील चार स्थळांना रामसर दर्जा मिळाला ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी केलेल्या ट्विट संदेशांच्या मालिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की, " भारतातील चार स्थळांना रामसर दर्जा मिळाला ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. नैसर्गिक अधिवासांचे तसेच वनस्पतींचे संरक्षण यांच्या माध्यमातून पृथ्वीची हिरवाई राखण्याची शतकानुशतकांची भारतीय परंपरा यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे".

 

 

 

 Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745892) Visitor Counter : 248