माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जन भागीदारीच्या भावनेने आझादी का अमृत महोत्सव साजरा होणार


दूरदर्शन आणि आकाशवाणीवर स्वातंत्र्य दिनाचे संपूर्ण दिवस विशेष प्रसारण

आकाशवाणीचा ‘आझादी का सफर आकाशवाणी के साथ’ हा कार्यक्रम 16 ऑगस्टला प्रसारित होणार

डीडी न्यूज वर क्षेत्रनिहाय विशेष कार्यक्रम

भारतीय देशभक्तीपर चित्रपटांचा तीन दिवसीय चित्रपट महोत्सव

Posted On: 13 AUG 2021 7:50PM by PIB Mumbai

 

भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमासाठी व्यापक सहभाग आणि जागृती करण्याकरिता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जन भागीदारी आणि जन चळवळीच्या भावनेने  हा महोत्सव साजरा करण्यासाठी कल्पक कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे. नव भारताची वाटचालीत देशभक्ती आणि त्याग भावनेचे स्मरण करण्यामध्ये जन सहभाग सुनिश्चित करण्याचा यामागचा उद्देश आहे. विविध प्रकार आणि माध्यमांद्वारे देशभरात माध्यम विभागानी कार्यक्रमांची मालिका  आखली आहे.

स्वातंत्र्य लढ्यातल्या अनाम वीर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण करणारा कार्यक्रम हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे.आकाशवाणी 16 ऑगस्ट 2021 पासून राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर आझादी का सफर आकाशवाणी के साथहा अनोखा  कार्यक्रम करणार आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि  दिवसाच्या प्रमुख ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडी यावर पाच मिनिटांचा कॅप्सूल आधारीत हा दैनिक कार्यक्रम सकाळी 8:20  (हिंदी) आणि सकाळी 8:50  (इंग्लिश)मधून प्रसारित होईल. जन भागीदारीची भावना अधिक बळकट करत आकाशवाणीने  16 ऑगस्ट 2021 पासून राष्ट्रीय आणि प्रादेशिक अमृत महोत्सव संकल्पना प्रश्न मंजुषा  (हिंदी सकाळी 8 ते  8:30 आणि इंग्लिश सकाळी 8:30 ते 9) आयोजित केली आहे.

16 ऑगस्ट 2021 पासून डीडी नेटवर्कवर त्या दिवसाच्या महत्वाच्या ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडीचे वर्णन करणाऱ्या पाच मिनिटांच्या कॅप्सूल सादर करणार आहे.  डीडी न्यूजवर सकाळी 8:55 ला आणि डीडी इंडियावर सकाळी 8:30 ला दररोज हा कार्यक्रम होणार आहे. देशभक्ती आणि त्याग यावर आधारित चित्रपट दूरदर्शन दाखवणार आहे. हिंदुस्थान की कसम,तिरंगा  हे चित्रपट 15 ऑगस्ट 2021 ला दाखवण्यात येतील. स्टार्ट अप, संरक्षण,अंतराळ आणि ऐतिहासिक कायदे यावर आधारित क्षेत्रनिहाय विशेष मालिका प्रसारणाला सुरवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनी डीडी संपूर्ण दिवस विशेष  कव्हरेज सुनिश्चित करणार असून लाल किल्यावरुन थेट  प्रसारणासह महत्वाच्या प्रसंग दाखवणारे विशेष कार्यक्रम दाखवण्यात येतील.

गांधी, मेकिंग ऑफ महात्माघरे बैरे यासारखे नावाजलेले चित्रपट एनएफडीसीच्या वतीने ओटीटी मंचावर www.cinemasofindia.com 15 ते 17 ऑगस्ट 2021 पर्यंत दाखवणार आहे. याच काळात चित्रपट प्रभागानेही भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य सैनिक समर्पित तीन दिवसीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. व्यापक प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी देशभरातल्या विविध संस्थांच्या समन्वयाने हा महोत्सव आयोजित केला जाईल.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंची माहिती देण्यासाठी मंत्रालयाचे सोशल मिडिया मंच माहितीपर दृक्श्राव्य आशयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत.  युवा आणि मुलांच्या सहभागासाठी इंटरनेट वापर कर्त्यांकडून विविध संकल्पनांवर आधारित व्हिडीओ आमंत्रित करण्यात आले असून या मंचावर ते दाखवले जातील.

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745569) Visitor Counter : 485