पंतप्रधान कार्यालय
जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण हा भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा – पंतप्रधान
Posted On:
13 AUG 2021 11:35AM by PIB Mumbai
वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
‘वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा आहे.वाहने भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार परिषदेमुळे संधीची नवी दालने खुली होणार आहेत. आपले युवा आणि स्टार्ट अप्स यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची मी विनंती करतो.’ असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
वाहने भंगारात काढण्यासंदर्भातल्या या धोरणामुळे रस्त्यावर धावण्यासाठी अयोग्य आणि प्रदूषणकारक वाहने, पर्यावरण स्नेही पद्धतीने टप्याटप्याने भंगारात काढण्यासाठी मदत होणार आहे.व्यवहार्य चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि पर्यावरणाप्रती उत्तरदायित्व निभावत सर्व संबधितांसाठी योग्य मूल्य आणणे हे आपले उद्दिष्ट असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745372)
Visitor Counter : 325
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam