पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे केले आवाहन


हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते : पंतप्रधान

Posted On: 07 AUG 2021 1:36PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले  की हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते. त्यांनी  स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

"हातमागामध्ये भारताची विविधता आणि असंख्य विणकर आणि कारागीरांचे कौशल्य दिसून येते. राष्ट्रीय हातमाग दिवस हा  #MyHandloomMyPride ची भावना बळकट करून आपल्या  विणकरांना पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. चला आपण सगळे स्थानिक  हातमाग उत्पादनांचे समर्थन करूया !"

ऑलिम्पिक पदक विजेत्या सायखोम मीराबाई चानूच्या ट्विटचा दाखला  देत  पंतप्रधानांनी ट्विट केले:

"गेल्या काही वर्षांत हातमागांबद्दल नव्याने रुची निर्माण झाली आहे. @Mirabai_chanu #MyHandloomMyPride च्या भावनेला पाठिंबा देत आहे हे पाहून आनंद झाला. मला विश्वास आहे की हातमाग क्षेत्र आत्मनिर्भर भारत उभारणीसाठी योगदान देत राहील."

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743540) Visitor Counter : 248