पंतप्रधान कार्यालय
भारतातील लसीकरण मोहिमेने ओलांडला 50 कोटींचा टप्पा, देशाच्या कोविड विरुद्धच्या लढ्याला मोठे बळ – पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2021 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2021
भारतातील कोविड लसीकरण मोहिमेने आज 50 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा पूर्ण केला, या मैलाच्या टप्प्यानंतर, पुढेही आपण लसीकरणाची गती अशीच कायम ठेवू आणि ‘सर्वांना लस-सर्वांना मोफत लस’ मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करु, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
"भारताच्या कोविडविरुद्धच्या लढाईला आज मोठे बळ मिळाले आहे. लसीकरणाच्या आकडेवारीने 50 कोटी मात्रांचा टप्पा पार केला. आता याच भक्कम पायावर, आपण लसीकरणाची संख्या अधिकाधिक वाढवत नेऊ आणि ‘सर्वांना लस, मोफत लस” मोहिमेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करू, अशी आशा आहे.”
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1743424)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam